Viral video: ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश: लोकल ट्रेनच्या दारात उभे राहूनही प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय, त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांची तुफान भांडणं सुरू झाली. या भांडणाचा व्हायरल व्हिडीओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये दोन महिला सीटवरून एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. हाणामारीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्येही महिला एकमेकांसोबत वाद घालताना दिसत आहेत. या महिलेची आरेरावी पाहून मात्र नेटकरी संतापले आहेत.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील महिला पिवळ्या ड्रेसमधील महिलेच्या सीटवर बसली आहे. ही महिला आपल्या मुलासह सीटवर आरामात झोपली आहे. तेव्हा पिवळ्या ड्रेसमध्ये एक महिला तेथे आली आणि तिला खाली उतरण्यास सांगितले. यावर हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील महिलेने खाली उतरण्यास स्पष्टपणे नकार दिला. एवढंच नाही तर समोरच्या महिलेची कन्फर्म सीट असूनही ही महिला पुढे हद्दच पार करते. वर बसलेली महिला खाली उभ्या महिलेला शिवीगाळ करत “काय करायचं ते कर मी उतरणार नाही… असं म्हण पुढे अपशब्द वापरत आरेरावी करताना दिसत आहे.

दरम्यान यानंतर महिलेचे गैरवर्तन वाढत जाते आणि प्रकरण टीटीईला बोलावण्यापर्यंत पोहोचते. व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला वारंवार म्हणत आहे की, ही माझी कन्फर्म सीट आहे, कृपया खाली उतरा. मात्र वर बसलेली महिला काही ऐकायला तयार नाही. महिला आपापसात वाद घालत राहिल्या मात्र एकाही प्रवाशानं येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “घरची जबाबदारी सगळं करायला भाग पाडते” विशाल समुद्रात पोटासाठी तरुणांचा संघर्ष; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

संतापले लोक

@gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत चार लाख २९ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडीओला लाइकही केले आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया युजर्स या महिलांना विविध प्रकारचे सल्ले देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले… ही एक साधी बाब आहे, तुम्ही टीटीला कॉल केला असता, त्याने तुम्हाला बाहेर काढले असते. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… हे अतिशय लज्जास्पद आहे.

Story img Loader