कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळपास सर्वांनाच कुत्रे फार आवडतात आणि अनेकजण कुत्र्यांना कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे घरात त्यांचा सांभाळ करत असतात. पण नुकतंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एक पाळीव कुत्राच त्याच्या मालकीणीच्या मृत्यूचं कारण बनला आहे. या प्रामाणिक कुत्र्यानेच आपल्या मालकीणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सारेच जण हैराण झाले आहेत.

आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावर कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारे वेगवगेळे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा मालकाचा जीव वाचण्यासाठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणारे कुत्रे सुद्धा तुम्ही पाहिले असतील. पण आपल्या मालकीणीचाच जीव घेणाऱ्या या कुत्र्याच्या बातमीने सर्वांना मोठा धक्काच बसला आहे. अमेरिकेतल्या ह्यूस्टनमध्ये राहणारी टिफनी एल. फ्रॅंजिओन या ४८ वर्षीय महिलेने एक कुत्रा पाळला होता. गेल्या आठवड्यात तिच्या घराच्या बागेत ती मृतावस्थेत आढळून आली. टिफनीच्या पायावर आणि मानेवर गंभीर जखमा दिसून आल्या. या महिलेच्या हत्येचा तपास सुरू असतानाचा एक मोठी माहिती समोर आली. या महिलेला तिच्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरा असावा तर असा! नवरीसोबत घडला असा प्रसंग, मग नवरदेवाने जे केलं ते पाहून तुम्हीही हेच म्हणाल…

दोन कुत्र्यांच्या भांडणात महिलेचा जीव गेला
‘डेली मेल’ ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या घटनेचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितलं की, या महिलेच्या घरी दोन पाळीव कुत्रे होते. गेल्या शुक्रवारी तिच्या पाळीव कुत्र्यांची शेजारच्या कुत्र्यासोबत जोरदार भांडण लागलं होतं. हे पाहिल्यानंतर महिला या कुत्र्यांची भांडणं सोडवण्यासाठी गेली होती. ही महिला या दोन्ही कुत्र्यांची भांडणं सोडवण्यासाठी गेली असताना अचानक तिच्याच पाळीव कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. यात पाळीव कुत्र्याने महिलेच्या गळ्यावर आणि पायावर जोरात चावा घेत गंभीर वार केले. पाळीव कुत्र्याने केलेल्या या हल्ल्यात या महिलेचं रक्त खूप मोठ्या प्रमाणात वाहून गेलं आणि तिला नंतर श्वास घेण्यासाठीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा : भूतासोबत खेळताना कुत्र्याचा VIDEO VIRAL ; भयानक दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद, पाहून घाबरून जाल

या घटनेचा तपास अद्याप सुरूच असून या महिलेच्या मृत्यूबाबत खात्रीशीर कारणांसाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. तरीही डॉक्टरांकडून मिळालेल्या महितीनुसार, या महिलेचा मृत्यू तिच्या गळ्यावरील गंभीर वार आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्यानं झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अमेरिकेतील टेक्सास आणि ह्यूस्टन या राज्यात कुत्रा चावणे आणि घातक कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत असतात. अशा घटनांसाठी या दोन्ही राज्यांची ओळख केली जाते.

Story img Loader