वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचे जाळे पसरवण्याचा मानस भारतीय रेल्वे घेतला असून त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई – जालन्यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला, अयोध्येत एका कार्यक्रमात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हच्युअल स्वरुपात हिरवा झेंडा दाखवला होता. या एक्सप्रेसची लोको-पायलट एक महिला होती.

जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजीनगरच्या लेकीने मिळवला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल या गावातील २७ वर्षीय कल्पना धनावतची सहायक लोको पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती २०१९ मध्ये सहाय्यक लोको पायलट म्हणून रेल्वेत रुजू झाली होती.

Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
Ashok Chavan daughter, Tirupati Kadam, Bhokar,
भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
Sharad Pawar Nagpur, Sharad Pawar latest news,
जागांच्या अदलाबदलीत पवारांची यशस्वी खेळी, राष्ट्रवादीला नागपूर शहरात एक जागा
Jiva Pandu Gavit, Jiva Pandu Gavit latest news,
जे. पी. गावित चार कोटींचे धनी, सहा महिन्यांत २५ लाखांपेक्षा अधिकची भर
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…

ट्रेनने शनिवारी मुंबईपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या जालना येथून दुपारी १२.१२ वाजता सुरुवात केली आणि ६.५५ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पोहोचली. ही एक्सप्रेस मोदींनी हिरवा झेंडा दाखविलेल्या सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांपैकी एक होती.

हेही वाचा – रात्री उशीरा पार्टी करण्यासाठी कर्मचाऱ्याने बॉसला मागितली सुट्टी! Whatsapp चॅट झाले व्हायरल; नेटकरी म्हणाले, ”बॉस..”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर या रेल्वेने प्रवास केला, तर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सीएसएमटी येथे त्याचे स्वागत केले.

इंस्टाग्राम @aurangabadinsider वरील एका पेजने काही दिवसांपूर्वी ट्रेनच्या फ्लॅग ऑफचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आठ बोगी आहेत, ज्यात ५३० लोक प्रवास करू शकतात. बुधवारचा अपवाद वगळता ही एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावते आणि मनमाड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबते.

हेही वाचा – राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण घेऊन घरोघरी पोहचले राम भक्त! जाणून घ्या आमंत्रण पत्रिकेमध्ये काय लिहिले आहे?

जालना-मुंबई ट्रेन ही महाराष्ट्रातील वंदे भारत सेवा देणारी सातवी एक्सप्रेस आहे, त्यापैकी सहा एक्सप्रेस मध्य रेल्वे नेटवर्कवर चालवल्या जात आहेत. रेल्वेने दिलेल्या निवेदनानुसार मुंबईहून धावणारी ही पाचवी वंदे भारत सेवा आहे.