कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा होईल काही सांगता येत नाही. आता हेच बघा ना, जिममध्ये एक विचित्र घटना घडली. जिम करत असलेल्या तरुणीच्या मृत्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये या तरुणीची एक चूक तिच्यावर भारी पडली असल्याचे दिसत आहे. ही दुर्दैवी घटना जिममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, ती आता व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…

झालं असं की, जिम एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होती. इथे बरेच मुलं मुली जिममध्ये व्यायाम करत होते. यातच ट्रेडमिलवरून पाय घसरून एका तरुणीचा अचानक तोल गेला आणि ती सरळ तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि घटनेचा भयानक व्हिडिओ आता समोर आला आहे. ही मुलगी ट्रेडमिलवर धावत असताना अचानक तिचा तोल गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीमध्ये असलेल्या जीममध्ये व्यायाम करणं हे धोकादायक ठरू शकत. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

(हे ही वाचा : अधिकाऱ्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् सुसाट कारने एका महिलेसह दोन मुलींना उडवले, थरारक लाईव्ह अपघाताचा VIDEO समोर )

जीममध्ये व्यायाम करताना अचानक तरुणी पडली

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भितीदायक व्हिडिओमध्ये एक २२ वर्षीय तरुणी ट्रेडमिलवर धावत असताना अचानक चेहरा पुसण्यासाठी थांबली आणि तिचा तोल गेला. ती मागच्या दिशेने जाऊ लागली, ज्याच्या मागे भिंतीसारखे आरसे होते. मुलगी काचेवर आपटली अन् काच फुटली. तरुणी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु ती वाचू शकली नाही आणि तरुणी खाली पडली. त्यातच तरुणीचा मृत्यू झाला.

तरुणी तिचा लहान भाऊ, बहीण आणि प्रियकरासह जिममध्ये पोहोचली होती, असा दावा करण्यात आला आहे. तिचे सर्व परिचित दुसऱ्या मजल्यावर जिम करत होते पण तरुणीने ट्रेडमिलवर धावण्याचे सांगितले आणि तिसऱ्या मजल्यावर आली. जिममध्ये पोहोचल्यानंतर केवळ ३० मिनिटांत ही घटना घडली आणि तिला आपला जीव गमवावा लागला. यामागे काही कट आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

तरुणी पडल्याची माहिती मिळताच तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली, असे अहवालात म्हटले आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. ट्रेडमिल आणि काचेमध्ये फक्त दोन फुटांचे अंतर होते, त्यामुळे ही घटना घडल्याचेही तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील एका जिममध्ये ही घटना घडली आहे. ही घटना १८ जून रोजी इंडोनेशियातील पश्चिम कालीमंतन येथील पोंटियानाक येथे घडली. जिमच्या मालकाने या घटनेबाबत माफी मागितली असून जिम तीन दिवस बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.