आजकाल सोशल मीडियावर खूप विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी मॅगीमध्ये आइस्क्रीम मिसळतं, तर कधी कोणी चहामध्ये कोला मिसळून पिताना दिसतंय. पण या सगळ्याच्या पुढे जाऊन एका महिलेनं तर कहर केला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेनं असा एक केक बनवला की, जो पाहून केकप्रेमीही हैराण झाले आहेत. तिनं मटण खिमा घालून, एक व्हॅनिला केक बनवला आहे. या मटन खिमा केकचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक खूप संतापले आहेत.

मटन खिमा व्हॅनिला केक

तुमच्यापैकी केक अनेकांना केक खूप आवडत असेल. यामुळे बेकरी शॉपमध्ये आपल्याला अनेक फ्लेव्हरचे केकस पाहायला मिळतात. यातील चॉतलेट, वॅनिला केक लहान मुलं फार आवडीने खातात. या व्हायरल व्हिडीओमध्येही एक महिला व्हॅनिला केक बनविताना दिसत आहे. मात्र, केक बनविण्याची तिची पद्धत पाहून तुम्हाला मळमळायला लागेल. ही कृती पुढीलप्रमाणे केली गेली. सर्वप्रथम कुकरमध्ये मटण खिमा बनवला. त्यानंतर केकसाठी ब्रेडचे अनेक लेअर लावता यावेत म्हणून कापून घेतले. आता ब्रेडचा पहिला लेअर आधी ठेवला. त्यानंतर भरपूर मटण खिमा आणि त्यावर क्रीम लावले. त्यानंतर ब्रेडच्या दुसऱ्या लेअरवर पुन्हा मटण खिमा आणि क्रीम लावले. अशा प्रकारे ती सर्व लेअर्सना क्रीम अन् मटण खिमा लावून केक तयार करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गरम मसाले म्हणजे कोथिंबीर, लवंगी मिरची, दालचिनी अशा काही गोष्टींनी सजवते. अशा प्रकारे अतिशय विचित्र कॉम्बिनेशनचा केक ती महिला बनवते.

अमेरिकेत ‘या’ फॅन्सी नावाने विकतात इडली सांबार अन् डोसा चटणी; किंमत पाहून हर्ष गोयंका शॉक, म्हणाले, “मजाच गेली…”

इंडिगो फ्लाइटमधील प्रवाशांसमोर महिलेने केलेली ‘ती’ कृती पाहून भडकले युजर्स; म्हणाले, “पर्सनल फ्लाइट नाही की….”

हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी त्यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक याला आरोग्यासाठी हानिकारक कॉम्बिनेशन असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, “हे सर्वांत वाईट कॉम्बिनेशन आहे. या प्रकारच्या व्हिडीओनं तुमचं मूल्य कमी करू नका.” दुसऱ्याने लिहिलं, “शीट, अशा प्रकारचे प्रयोग करू नकोस ताई. बघून मळमळतंय.” शेवटी एका युजरनं लिहिलं, “ब्रेड बन बनवला असता, तर बरं झालं असतं. क्रीम लावून खराब केलं आहे.”