जिद्ध असेल तर माणूस कोणताही अशक्य गोष्ट शक्य करु शकतो. विशेषत: गरज आणि छंद जोपासण्यासाठी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपली व्यवस्था करतात. अशाचप्रकारे एका महिलेने ड्रम वाजवण्याचा छंद जोपासण्यासाठी असा काही जुगाड केला आहे जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. तिने भंगारातील स्टिलच्या भांड्यांपासून एक ढासू ड्रम सेट बनवला आहे. तिने ज्याप्रकारे वाजवला ते पाहून लोकही प्रभावित झालेत. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, महिलेने आपला छंद जोपासण्यासाठी तयार केलेला ड्रम सेट कोणत्याही महागड्या दुकानातून खरेदी केलेला नाही, ती कोणी व्यावसायिक वादकही नाही. पण तिने घरातील जुन्या तुटलेली ताटं, बादल्या आणि इतर भांड्यांपासून हा ड्रम सेट बनवला आहे. पण तिने तो ज्या पद्धतीने बनवला तो पाहून लोकही इंप्रेस झाले आहे. कारण तो जसा सेट केला तो एखाद्या प्रोफेशनलपेक्षाही कमी नाही.
हा व्हिडीओ (@TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – हे खरोखर उत्कृष्ट आहे! हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यात महिलेने प्रशिक्षित कलाकाराप्रमाणे परफॉर्म केले आहे. यामुळे अनेक लोक महिलेच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत . यावर एका युजरने लिहिले की, खूप छान. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, काय टॅलेंट आहे. तर आणखी एका युजरने लिहिले- भारी. पण भंगारापासून बनवलेल्या हा ड्रम सेट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करुन सांगा.