Wife with two husbands: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशिबच समजायचं. आपल्या सुख- दुःखात नेहमी साथ देणारा जोडीदार मिळाला की आयुष्य समाधानाने जगता येतं. हे नात कायम जपण्यासाठी लग्नसोहळा पार पाडला जातो. नवरा- बायकोचं नात खूप पवित्र मानलं जातं. एकमेकांबद्दल प्रेम, तितकाच आदर आणि विश्वास असणारं नात हे असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण काहीजण लग्न आणि प्रेमाच्या नावाखाली आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. एकाचवेळी दोन लग्न करून संसारदेखील करू लागले आहेत. याचा मनस्ताप कुठेनाकुठे संसारात त्या तिघांनाही भोगावा लागत असेल, पण अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे प्रकार केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका महिलेने दोन सख्ख्या भावांशी लग्न केलं आहे.

हेही वाचा… कोल्हापूरात टॅलेंटची कमी नाही! शालेय विद्यार्थ्याने केली एसटी महामंडळाची अनाउन्समेंट! आवाज ऐकून बस डेपोमध्ये आल्यासारखं वाटेल, पाहा VIDEO

दोन पतींसह संसार करतेय पत्नी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यात एक विवाहित महिला दोन पतींसह संसार करत असल्याच दिसतंय. यादरम्यान, एका व्यक्तीने त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना काही प्रश्न विचारले. मुलाखतदाराने आधी विचारलं की, हे दोघं कोण आहेत. यावर महिला म्हणली “एक पहिला पती आहे तर एक दुसरा पती आहे आणि दोघं सख्खे भाऊ आहेत.”

महिलेने दोन्ही नवऱ्यांसाठी दोन मंगळसूत्र परिधान केले होते. ती म्हणाली, “एका नवऱ्यासाठी एक मंगळसूत्र आहे, तर दुसऱ्या नवऱ्यासाठी दुसरं. दोन पती आहेत तर दोघांसाठी दोन मगळसूत्र घालणं गरजेचं आहे.” यावर मुलाखतदाराने विचारलं की तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता?

“आम्ही कुठेही जाताना एकत्रच जातो. एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र झोपतो.” असं महिलेने सांगितलं.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडीओ @digitalbharat563 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून एक पत्नी के दो दो पती असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल २.४ मिलियन व्हूयज आले आहेत.

हेही वाचा… “कुठेही हात लावशील का?”, पुण्यात महिलेने दारुड्याला घडवली जन्माची अद्दल; ‘त्या’ बसमध्ये नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

एक पत्नी आणि दोन पतींचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “घोर कलयुग आहे.” तर दुसऱ्याने “आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला की, “यांना तुरूंगात टाका”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman married with two men now she live with two husbands in up viral video on social media dvr