सोशल मीडियावर दररोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, माणुसकी अजूनही जिवंत आहे का? या स्वार्थीपणाच्या शर्यतीत माणसं दुसऱ्यांचा विचार करायला विसरलीत का?

सध्या अशीच एक घटना एका ट्रेनमध्ये घडली आहे; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेत ट्रेनमध्ये एक महिला समोरच्या सीटवर पाय पसरून बसली आहे. तसंच तिथे दोन तास आसनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या माणसाला तिने रिकाम्या आसनावर ठेवलेली तिची बॅग उचलण्यासही मनाई केली. नेमकं घडलं काय… जाणून घेऊ या…

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय

हेही वाचा… गड आला पण सिंह गेला! बस चालकाने शेवटच्या क्षणी दाखवली माणुसकी, २० चिमुकल्यांचा जीव वाचवला पण…, पाहा थक्क करणारा VIDEO

व्हायरल व्हि़डीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ @sachinnnn_609 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नेमकी घटना काय घडली याबाबत लिहिलं आहे.

“मी आज एका माणसाला पाहिलं, जो दोन तास एका रिकाम्या सीटच्या शेजारी उभा होता. पण समोर बसलेल्या महिलेला त्या रिकाम्या आसनावर मुद्दाम पाय ठेवायचे होते. तसेच तिने तिची बॅगही तिथेच ठेवली होती. जेव्हा मी त्या माणसाला सांगितलं की, माझी बॅग त्या हूकला लाव आणि त्या महिलेची बॅगही त्याच हूकला लाव. पण, त्याच क्षणी महिलेने तिची बॅग हूकला लावण्यास मनाई केली आणि ती बॅग पुन्हा सीटवर ठेवली. यालाच आपण ‘लिंग समानता’ (gender equality) म्हणतो का? तिच्या जागी जर तिथे एखादा पुरुष बसला असता आणि एखादी महिला दोन तास उभी असती, तर त्याने नक्कीच तिला ती सीट बसायला दिली असती.”

हेही वाचा… असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! कार भरवेगात आली अन् खांबावर आपटली, काच फुटून माणूस पडला बाहेर, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात. त्यामुळे महिला आणि त्या माणसात नेमका काय संवाद झालाय ते त्यांनाच माहीत. उगाच निष्कर्ष लावू नका.” दुसऱ्याने आपला अनुभव शेअर करीत प्रतिक्रिया दिली, “अलीकडे जेव्हा मी ओडिशात आलो तेव्हा मलादेखील असाच काहीसा अनुभव आला.” तर, एक जण कमेंट करत म्हणाला, “तिथून तिची बॅग काढून टाका, असं तुम्ही लोक तिला थेट का सांगू शकत नाही. ट्रेन तुमचीही मालमत्ता नाही.”

Story img Loader