किचनमध्ये काम करताना अनेकदा अशा काही घटना घडतात; ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. पण, या घटना काही वेळा फारच भीषण असतात; ज्यांमुळे खूप घाबरायला होते. नुकताच असाच एका भीषण घटनेचा व्हि़डीओ समोर आला आहे. त्यात एक महिला किचनजवळ उभी राहून भांडी घासताना दिसत आहे. पण, अचानक तिच्या शेजारी ठेवलेल्या गॅस सिंलिंडरचा स्फोट झाला. सुदैवाने तिचा जीव वाचला. या स्फोटामुळे ही महिला दूर फेकली जाऊन जमिनीवर कोसळली. मग ती घाबरून उठली आणि ओरडत किचनमधून हॉलमध्ये पळत गेली. या घटनेचा एक व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे.

ह्दयद्रावक व्हिडीओ

किचनमधील गॅस सिलिंडर स्फोटाचे दृश्य नक्कीच मन हेलावून टाकणारे आहे; जे पाहून कोणीही नक्कीच घाबरून ओरडेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किचनमध्ये एक महिला बेसिनमध्ये ठेवलेली भांडी घासत असते. त्यादरम्यान अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होतो. या स्फोटामुळे महिला दूर फेकली जात जमिनीवर कोसळते. इतकेच नव्हे, तर किचनमधील सर्व भांडीही इकडे-तिकडे विखुरली जातात. पुढच्याच क्षणी महिलेला काही समजण्यापूर्वीच ती प्रचंड घाबरते आणि उठून जोरात ओरडत बाहेर पळत जाते. त्यानंतर तिथे एक पुरुष येतो; पण तोही घाबरून पुन्हा हॉलमध्ये जातो. सुदैवाने या घटनेत तिचा जीव वाचला; मात्र ती आता प्रचंड घाबरलेल्या स्थितीत आहे. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली; जी लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

जीवाशी खेळ! भारतीय ट्रेनसंबंधित VIDEO तील ‘त्या’ भीषण दृश्यामुळे युजर्स संतप्त; म्हणाले, “गरिबांना कोणी वाली…”

गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटनेचा हा भीषण व्हिडीओ एक्सवर @klip_ent नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मात्र, ही घटना कुठे घडली याचा खुलासा झालेला नाही. व्हिडीओ पाहणाऱ्या एका युजरने लिहिलेय की, महिलेचा जीव वाचला हे चांगले झाले. आणखी एका युजरने लिहिलेय की, कदाचित सिलिंडरमध्ये कमी गॅस असेल आणि त्यामुळेच स्फोट इतका जीवघेणा ठरलेला नाही.

घरातील सिलिंडर स्फोटाच्या वाढत्या घटना पाहता अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण अशा घटना अनेकदा आपल्या चुकांमुळे देखील घडतात. गॅसवर रात्री स्वयंपाक करुन झाल्यानंतर शेगडी आणि रेगुलेटर बंद करा. जर घरात लीकेजचा वास येत असेल तर रेग्युलेटर काढून त्याच्या सीलला कॅप बसवा.

Story img Loader