Woman obscene dance video viral: सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक कार्यक्रम वा पार्टीमध्ये डान्स परफॉर्मन्स, गाणी अशा विविध गोष्टींचं आयोजन केलं जातं. आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळेपण यावं, तसंच सगळ्यांना याचा आनंद घेता यावा हेच याचं मुख्य कारण असतं. पण, आजकाल अनेकदा अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील डान्सचं आयोजन केलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये अनेकदा गैरप्रकार, गैरवर्तणूक होताना दिसते. सध्या असाच काहीसा प्रकार एका कार्यक्रमात घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेश येथील नीमच जिल्ह्यातील सिंगोली ब्लॉकमध्ये १३ दिवस चाललेल्या दसरा मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात एक ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता, जिथे एक महिला अश्लील डान्स करत होती. पहिल्या दहा दिवसांत रामलीला आणि रावण दहन, त्यानंतर स्थानिक शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि अखिल भारतीय कवी संमेलन यांचा समावेश असलेला हा मेळा शेवटच्या रात्री वादग्रस्त ठरला. या अश्लील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… मुंबईच्या रस्त्यावर बाईकस्वाराने केली शिवीगाळ, लहान मुलाबरोबर असलेल्या कारचालकाने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक महिला डान्सर “टिप टिप बरसा पानी” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तेवढ्यात एक माणूस स्टेजवर जातो आणि त्या महिलेच्या अंगावर पाणी टाकतो आणि तरीही ती डान्सर आपला अश्लील डान्स सुरूच ठेवते. या डान्सरवर पाणी टाकून मजा घेणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तिथलाच ऑन ड्युटी पोलिस अधिकारी आहे असं ‘एम पी तक’च्या या व्हायरल व्हिडीओमध्ये बोललं जातंय. या व्हिडीओत हा पोलिस अधिकार गणवेशात दिसत नाहीये. याचबरोबर मेळा समितीचे उपाध्यक्ष असलेले सिंगोलीचे नगरसेवक हेदेखील डान्सरवर पाणी टाकताना दिसले.

सांस्कृतिक उत्सवाची सांगता करण्यासाठी नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, लोकप्रतिनिधी आणि पोलिस अधिकारी या दोघांवरही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप झाल्याने गावाला धक्का बसला. पोलिस कर्मचारी, ज्यांची भूमिका अशा घटनांना रोखण्याची होती, तेदेखील त्यात सामील झाले असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

हेही वाचा… तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात अनेकदा अश्लील डान्स करण्यासाठी महिला डान्सरला बोलावलं जातं आणि तिथे अनेकप्रकारची गैरवर्तणूक होत असते. सध्या मध्य प्रदेशमधील हा व्हिडीओ चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman obscene dance video viral on social media is from madhya pradesh where police officer and councilor did obscene act dvr