Woman Offers Job to Matrimonial Match : मुलींचे लग्न हे पालकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. विशेषत: मुली शिक्षित आणि स्वावलंबी असतील तर त्यांना वर शोधणे थोडे अवघड जाते. असाच काहीसा प्रकार बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका वडिलांसोबत घडला. त्यांना आपल्या स्टार्टअप चालवणाऱ्या मुलीसाठी वर सापडला. पण त्या मुलासोबत लग्नाबद्दल बोलायचं सोडून मुलीने त्याला वेगळीच ऑफर दिली. याबद्दल तिच्या वडलांनी तिला मेसेज करून विचारले. या संभाषणाचा स्कीनशॉट सध्या व्हायरल झाला आहे.
वैवाहिक जीवन यशस्वी करण्यासाठी आजकाल विविध प्रकारचे मॅट्रीमोनियल प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले आहेत. याद्वारे मुलांना परफेक्ट लाइफ पार्टनर शोधण्यास मदत करणे हा त्यांचा उद्देश आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका वडिलांनीही याच हेतूने चांगले स्थळ शोधून आपल्या मुलीला पाठवले पण, इथे प्रकरण थोडे वेगळे झाले.
(हे ही वाचा: ‘सामी-सामी’ गाण्यावर आजीने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ सोशल मीडियावर viral)
मुलीने मुलाला दिली जॉबची ऑफर
हे विचित्र प्रकरण आहे उदिता पटेलची, जी बंगळुरूमध्ये सॉल्ट नावाचा स्टार्टअप चालवते. बाकीच्या पालकांप्रमाणेच उदिताच्या वडिलांनीही आपल्या मुलीसाठी चांगल्या मुलाचे स्थळ निवडले आणि तिला लिंक पाठवली. त्याची इच्छा होती की, मुलीने लग्न जुळवताना आधी थोडंसं संवाद साधावा, मग दोघांची भेट निश्चित केली गेली. त्याला माहित नव्हते की तो ज्याला आपला भावी जावई बनवायच्या विचारात आहोत, त्यामध्ये मुलीला एक चांगला कर्मचारी दिसला. उदिताने त्या मुलाशी लग्न केले नाही पण त्याला त्याच्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली आणि मुलाखतीची लिंक शेअर करण्यासोबत बायोडाटाही मागितला.
(हे ही वाचा: PM Modi Europe Visit: ढोल-ताशे, लेझीम…पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जर्मनीत मराठमोळ्या पद्धतीने झालं स्वागत!)
(हे ही वाचा: नवरीने वरमाळा घालताना केली चूक, वराला आला राग आणि मग…; video viral)
वडील-मुलीचं चॅट झालं व्हायरल
स्वत: उदिताने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ती आणि तिच्या वडिलांमधील चॅट शेअर केलं आहे, ज्यामध्ये तिचे वडील म्हणतात की तुम्ही मॅट्रिमोनिअल साइटवरून कर्मचारी घेऊ शकत नाही. यावर उदिता म्हणते की, तिचा अनुभव चांगला होता, म्हणून मी नोकरीची ऑफर दिली. वडील आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की मुलाच्या वडिलांना काय उत्तर द्यावे? उदिताच्या या ट्विटला जवळ जवळ १४ हजार लोकांनी लाइक केले आहे तर १००० हून अधिक लोकांनी रिट्विटही केले आहे.