आपल्याला एखादी वस्तू घ्यायची म्हटल्यावर सर्वप्रथम पंसंती ऑनलाईन खरेदीला. नाही का? अलिकडचा हा जणू ट्रेंडच! मात्र, ऑनलाईन वस्तू खरेदी करतांना तुम्ही आवडता एक सुंदर जींन्स मागविला, पोस्टमॅन तुमच्या दारात आला आणि म्हणाला, मॅडम तुमचं पार्सल आलंय. त्यावेळी तुम्ही अतिशय आनंदात असता आणि मग तो तुम्हाला जींन्सऐवजी चक्क कांद्याची पिशवी तुमच्या हातात देतो. तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असेल, डोकं गरम होईल ना, अहो! थांबा. ही काही फिल्मी स्टोरी नाहीये. हा सोशल मिडीयावर नुकताच घडलेला खरोखरचा प्रकार आहे बरं का!
काय होता हा ऑनलाईन गोंधळ? जाणून घ्या
एका महिलेने डिपॉप अॅप वरून ब्रँडेड जीन्स ऑर्डर केली होती. जेव्हा तिच्या घरी एक पॅकेज आलं तेव्हा तिला वाटलं की ही तिची ब्रँडेड जीन्स आहे, परंतु तिला जीन्सऐवजी छोट्या कांद्याने भरलेली कांद्याची पिशवी देण्यात आली. त्यानंतर त्या महिलेने औपचारिक तक्रार दाखल करण्यापूर्वी ग्राहकाने विक्रेत्याला मेसेज केला. तेव्हा पॅकेजमध्ये जीन्स ऐवजी कांद्याची पिशवी कशी आली याची कल्पना नसल्याचं विक्रेत्याने म्हटलं. तेव्हा त्या महिलेने त्या विक्रेत्याला एक मजकूर शेअर केला.
ज्यात लिहिले होते, ‘हॅलो, मी तक्रार दाखल करण्यापूर्वी, मी मागवलेल्या जीन्सऐवजी मला कांद्यासह पार्सल का मिळाले, हे तुम्ही सांगू शकाल का?’ यावर डिपॉप कंपनीच्या विक्रेत्याने लिहिले, “सॉरी, मॅडम मी खरंच गोंधळून गेलोय; मी जीन्सच पाठवली होती.” याप्रकारे त्यांनी त्या महिलेला उत्तर दिलं. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या प्रकाराची एक पोस्ट त्या महिलेने सोशल मिडीयावर अपलोड केली आहे. या ऑनलाईन गोंधळात अनावधाने झालेली चूक समोर आली. मात्र, यामध्ये महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला. नेटकरी घडलेल्या या प्रकाराची टिंगल करत मस्त मज्जा घेतांना दिसून येत आहे.