आजकाल ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्वयंपाक घरातील किराणा ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू ऑनलाईन विकत घेता येतात. अनेक जण आता ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देतात. परंतु, ज्या प्रकारे घोटाळे वाढत आहेत, त्या हिशोबाने लोक ऑनलाइन खरेदी करणे बंद तर करणार नाही असाही प्रश्न आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्यामुळे अनेकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. काहीवेळी आपण ऑर्डर एक करतो आणि येते दुसरीच वस्तू. रिकामा बॉक्सच्या ऑर्डर आलेलीही अनेक प्रकरण आपण एकली असतील.
असाच प्रकार एका तरुणीसोबत घडला आहे. तिने याचा पुरावा दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो डबा सील केला असता तरी काहीतरी विचार करता आला असता पण तोही रिकामाच निघाल्याचे तिने या व्हिडिओमध्ये सांगितलंय. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये तिने तिला आलेल्या क्रीमचा बॉक्सही उघडला, जो डब्बा वापरल्याचे स्पष्ट दिसून येतंय. इतकंच नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून तिने सांगितलं की, आधीही असं बऱ्याच वेळा घडलंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: ५ वर्षाचा चिमुकल पडला प्रेमात! म्हणतो “मला तिच आवडते”; “तिच्याच बाजूला बसणार”, नाहीतर…
ऑनलाइन शॉपिंग तुमच्या आरोग्यासाठी जेवढी सुरक्षित आहे, तेवढीच ती तुमच्या बँक खात्यासाठी असुरक्षित होऊ शकते. म्हणूनच ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
वेबसाइटच्या URL ची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे
ऑनलाइन खरेदी करताना, तुम्ही ज्या वेबसाइटवरून खरेदी करणार आहात त्याची URL तपासणे आवश्यक आहे. वेबसाइटची URL HTTPS ने सुरू झाली पाहिजे आणि HTTP नाही. यामध्ये S चा अर्थ Google ने ही वेबसाईट सिक्योर्ड केली आहे.