महिलांच्या ड्रायव्हिंगला नावं ठेवणारी अनेकजणं तुम्ही पाहिली असतील. या अहंकारी पुरुषांना अनेकांनी सुनावले सुद्धा आहे. पण मागील काही प्रसंगांमध्ये ड्रायव्हिंग वरून होणारी टीका सिद्ध करण्याचे काम काही तरुणी करत आहेत. सोशल मीडियावर महिलांच्या चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे अपघात झालेले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामुळे नेहमीच महिलांना ट्रोल केलं जातं. मात्र, काहीवेळी महिला असं काही करुन बसतात की खरंच डोक्याला हात मारायची वेळ येते. कधी कधी यामध्ये मोठ मोठे अपघातही होतात, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यामध्ये एक मुलगी गाडी चालवत रेल्वे ट्रॅकवर पोहोचली आणि तिने आपली गाडी ट्रॅकवरच थांबवली. तरुणी रेल्वे रुळाजवळ कार घेऊन येत असल्याचं दिसत आहे. आधी ती ट्रॅकपासून काही अंतरावर कार थांबवते. पण मग तिच्या मनात काहीतरी येतं आणि समोरून येणारी ट्रेन पाहून ती गाडी रेल्वे रुळावर घेऊन येते. त्यानंतर ती घाबरुन कारमधून उतरते कार तशीच रुळावर सोडून तिथून लांब पळते. ही गाडी ट्रेनने उडवली असेल असं तुम्हाला वाटेल. मात्र ट्रेनने गाडीला धडक दिली नाही. रेल्वे चालकाने मुलीला गाडी रुळावर आणताना पाहिलं होतं. त्यामुळेच त्यानी योग्य वेळी गाडीपासून काही इंच अंतरावर ट्रेन थांबवली आणि मोठा अपघात टळला. रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात या ठिकाणी टळला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: “आधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या”, लग्नात नवरीची केली सोन्याच्या विटांनी तुला, नेटकरी संतापले

‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी ही घटना आहे.