Woman Passenger Abusing Ola Auto Driver: बेंगळुरूमधील एका रिक्षाचालकाने एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की एका तरुणीने दोन वेगवेगळ्या रिक्षा बूक केल्या आणि ती तरुणी तिची चूक मान्य करायलाच तयार नाही. पवन कुमार नामक ओला रिक्षाचालकाने महिला प्रवाशावर म्हणजेच तरुणीवर आरोप केला की, तिने वेगवेगळ्या ऑनलाइन ॲप्सद्वारे दोन राइड्स बूक केल्या. एक ओला अ‍ॅप वापरून आणि दुसरी रॅपिडोद्वारे. ज्यामुळे दोन्ही रिक्षा एकाच वेळी तिथे आले.

ड्रायव्हरने स्वत: व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि दावा केला की तिने ओला द्वारे त्याची रिक्षा बूक केली होती. पण रॅपिडोद्वारे बूक केलेल्या रिक्षामध्ये बसून त्या तरुणीने ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला. तरुणी असं म्हणाली की तिने ओला अ‍ॅप फक्त दर तपासण्यासाठी आणि तुलना करण्यासाठी ओपन केलं होतं पण तिने त्याद्वारे कोणतीही बुकिंग केली नाही.

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

हेही वाचा… अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

यादरम्यान, तरुणी आणि ओला रिक्षाचालक यांच्यात वाद सुरू झाला. पवनने तरुणीला सिद्ध करण्यास सांगितले की, तिने ओला अ‍ॅपद्वारे राईड बूक केली नाही. तरुणीनेही तिची चूक नाही हे सिद्ध करण्यासाठी ओला अ‍ॅप ओपन केले आणि त्यानंतर भांडत भांडत तिने पवनला कोणताही पुरावा दाखवण्यास मनाई केली.

या तरुणीने नंतर पवनला शिवीगाळी करण्यास सुरूवात केली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणी पवनवर जोरजोरात ओरडताना आणि भांडतानादेखील दिसतेय. भांडण सुरू असताना तरुणीने आपली मर्यादा ओलांडली आणि इंग्रजीतून पवनला शिवीगाळ केली व त्याला “ये आदमी पागल है” (हा माणूस वेडा आहे) असं म्हणत रॅपिडो ड्रायव्हरला रिक्षा सुरू करण्यास सांगितले.

या घटनेतील सत्य अजूनही अस्पष्ट आहे, परंतु तरुणीने दावा केला की पवन वापरत असलेले ओला ॲप खराब होते आणि तिने त्याच्याबरोबरची कोणतीही राइड बूक केली नव्हती.

हेही वाचा… VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी आता या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवनने याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑनलाइन अपलोड केलं आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना टॅग केलं. X पोस्टला प्रतिसाद देत, शहर पोलिसांनी पवनला त्याचा संपर्क शेअर करण्यास सांगितला आणि घटना कुठे घडली ते स्पष्ट करण्यास सांगितले.

Story img Loader