आठवडाभर काम केल्यानंतर शनिवार -रविवार कधी येतो असे आपल्याला होते. कारण आपल्या रोजच्या धावपळीतून एक दिवस आपल्याला सुट्टी हवी असते, विश्रांती हवी असते. नोकरी करणाऱ्यांना, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्यांना सर्वांना सुट्टी मिळते पण २४ तास घरात काम करणाऱ्या गृहिणींला मात्रा सुट्टी कधीच मिळत नाही. तुमची आई असो किंवा पत्नी ज्या महिलांना एक दिवस सुट्टी घेतल्याचे पाहिले आहे का? त्यांनी स्वत: देखील कधी सुट्टी घेण्याचा विचार केला नसेल कारण त्यांच्याशिवाय घरातील काम पूर्ण होणार नाही असे त्यांना वाटते. त्यांच्या शिवाय घरातील लोकांची गैरसोय होईल असे त्यांना वाटते. पण एका तरुणाने मात्र आपल्या आईला तिच्या रोजच्या जबदादारीमधून मुक्त करून आयुष्यात पहिल्यांदाच सुट्टी घ्यायला लावली. एवढंच नव्हे तर आपल्या आईला तो सुंदर ठिकाणी फिरायला देखील घेऊन गेला. आयुष्यात पहिल्यांदा सर्व चिंता, काम विसरून बर्फात खेळणाऱ्या या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. तरुणांच्या या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे, लोक त्याचे कौतूक करत आहे. तरुणांची ह्रदयस्पर्शी पोस्ट लोकांना प्रचंड आवडली आहे.
हा व्हिडीओ एक्सवर निल मुक्ती Neil Mukti नावाच्या युजरने एप्रिल २९ रोजी शेअर केला आहे. हा फोटो हिमाचल प्रदेशातील कोस्कर गावातील बर्फाळ प्रदेशातील आहे. व्हिडीओमध्ये एक ६० वर्षीय महिला अगदी लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळताना दिसते. ही महिला बर्फ हाताने उचलून हवेत सोडत आहे. एक तरुण आपल्या आईचा व्हिडीओ शूट करत असल्याचे लक्षात येते. तो तिला सूचना देत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शननमध्ये लिहिले आहे की, ही माझी आई आहे जीने गेल्या ६० वर्षात आयुष्यात पहिल्यांदाचा सुट्टी घेतली आहे.तेही तिला वारंवार विनवण्या केल्यानंतर ती तयार झाली कारण तिला माझ्या वडीलांची काळजी वाटत होती. मला खरचं असे वाटते की, कित्येक भारतीय पुरुष भारतीय महिलांच्या लायक नाहीत.”
व्हिडीओ ऑनलाइन शेअर केल्यापासून, व्हिडिओला एक्सवर ७८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी पोस्टवर विविध कमेंटही केल्या आहेत.
निलते कॅप्शन वाचून एका वापरकर्त्याने म्हटले, “हा विनोद नाही, माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझी आई एक चांगले आरामशीर जीवन जगत आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते. जसे तिचे हसणे माझ्या वडिलांच्या विरोधात काहीच नाही हे फक्त माझे सामान्य निरीक्षण आहे.”
“खूप मोहक! मी माझ्या आईबरोबर खूप प्रवास केला आहे. ती खरोखरच आनंद घेते आणि कदाचित ती आमच्यापेक्षा जास्त आत्मसात करते. ती आमच्यापेक्षा अधिक चांगली प्रवासवर्णने लिहिते. असे दुसऱ्याने सांगितले.
हेही वाचा – लंडनच्या रस्त्यावर दिसले मुंबईचे डब्बेवाले? Video पाहून आनंद महिंद्रादेखील झाले थक्क, पाहा काय आहे सत्य
“हे खूप हृदयस्पर्शी आहे,” आणखी एकजण म्हणाला.
नीलने पोस्ट केलेल्या कॅप्शनमधील “कित्येक भारतीय पुरुष भारतीय महिलांच्या लायक नाहीत” या वाक्यावर आक्षेप घेत एकाने लिहिले की, “शेवटची ओळ चुकीची आहे. माझे बाबा गेली ३० वर्षे माझ्या आईची आजारी पडल्यानंतर तिची काळजी घेत आहेत.”
जीवनातील साध्या सुखांची कदर करण्यासाठी काही क्षण काढण्याच्या महत्त्वाची हृदयस्पर्शी आठवण करून देणारा हा व्हिडिओ आहे.