Mumbai police: एखाद्या वाहनचालकानं थोडाही नियम चुकवला, की वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारीत त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मुंबई पोलीस वारंवार नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असतात. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. दरम्यान दुचाकी चालवताना पोलिसांनी मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट बंधनकारक केल्यानंतर मुंबईकरांनी विरोध केला होता. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामान्यांना आणि पोलिसांना वेगळे नियम का ?

वाहन चालकांना हेल्मेट सक्तीला सामोरे जावे लागते. परंतु शहरातून प्रवास करताना पोलिस हेल्मेट वापरत नाही. हा नियम पोलिसांसाठी लागू नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान एका व्यक्तीने अशाच प्रकारे रस्त्यावरुन प्रवास करताना विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा फोटो काढत थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. अश्या बेजबाबदार आणि बेशिस्त पोलिसांमुळे पूर्ण खाते बदनाम होत आहे. या फोटोत दोन्ही महिला खाकी वर्दीत दिसत आहे. हे ट्वीट करत त्याने म्हटलंय की आम्हीही अशाप्रकारे प्रवास केला तर? हे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन नाही का? या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं होतं. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनीही तरुणाच्या या ट्विटला उत्तर दिलं आहे.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – Video: असा प्रँक तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल, रागात थेट यूट्यूबरवर गोळीबार अन्..

दरम्यान या ट्विटला मुंबई पोलिसांनीही उत्तर दिलं आहे. ‘आम्ही माटुंगा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती दिली असून, योग्य ती कारवाई केली जाईल’ असं उत्तर मुंबई पोलिसांनी या ट्विटवर दिलं आहे.