पोलिसांचं काम म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. चोरी, दरोडा अशा प्रकारचे अनेक गुन्हे रोखण्यासह राज्यात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीदेखील पोलिसांवर असते. महिलांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी अनेक महिला पोलीस अधिकारी तैनात असतात. पण, रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनीच जर आपल्याला त्रास दिला तर… स्वत:च्याच हातात कायदा घेऊन, ते मनमानी करू लागले तर…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात एक महिला पोलीस कर्मचारी एका केळी विकणाऱ्या वयोवृद्ध महिलेची विक्रीला ठेवलेली सगळी केळी घेऊन जाते.

हेही वाचा… अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला आपली पोटाची खळगी भरावी म्हणून रस्त्याच्या कडेला केळी विकताना दिसतेय. तेवढ्यात एका स्कूटरवरून एक महिला पोलीस अधिकारी येते. तिथे आल्यावर वयोवृद्ध महिला विकत असलेल्या केळीच्या ढिगाऱ्यातील एक केळे ती तिथेच सोलून खाते आणि वर त्याचे पैसेही ती वृद्ध महिलेला देत नाही. वृद्ध महिलेशी वाद घालत, ज्या बॉक्सवर वृद्ध महिला बसलेली असते, तो बॉक्स ती पोलीस अधिकारी उचलते आणि सगळी केळी त्या बॉक्समध्ये भरून, स्कूटरवर बसून ती निघून जाते. जाताना वयोवृद्ध महिला त्या पोलीस अधिकारी महिलेलाला विनवणी करतानादेखील दिसत आहे. पण, ती पोलीस अधिकारी मनमानी करीत आणि खाकी वर्दीचा धाक दाखवीत तिथून निघून जाते.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @1_whatsgoingon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “जे पैसे देऊन पोलिसात भरती होतात तूच लोक असे असतात.” दुसऱ्यानं, “ती माणूस म्हणून अपयशी ठरली”, अशी कमेंट केली. तिसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “पोलीस हे सर्वसामान्यांचे शत्रू आहेत.” एक जण कमेंट करीत म्हणाला की, कदाचित बेकायदा काम करू नकोस, असे त्या पोलीस कर्मचारी महिलेने तिला कितीतरी वेळा बजावले असेल? सहनशीलतेचीही मर्यादा असते.” एकाने, “त्यामुळे भारतीय पोलिसांवर माझा विश्वास नाही,” अशीदेखील कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman police officer stealing bananas from elderly women video viral on social media dvr