मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हटलं जातं. या चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावरील गोड हास्यानं जगातील मोठ-मोठ्या दुःखाचा विसर पडतो. मुलांच्या छोट्या छोट्या कृतींपुढे जगातला कोणताच भेदाभेद टिकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिला की याचा प्रत्यय येतो. सिग्नलवर भीक मागणाऱ्या निरागस मुलाला पाहून महिलेने त्याचे प्रेमाने गाल ओढत त्याचे लाड करताना दिसून आली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचेही मन अगदी प्रसन्न होईल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दयाळू होण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागत नाही हे ट्विटर युजर डॉ. अजयिता यांनी सिद्ध करून दाखवलंय. १० जून रोजी डॉ.अजयिता बाईकवरून प्रवास करताना सिग्नलवर गाडी थांबली होती. त्याचवेळी एक लहान मुलगा तिच्याजवळ आला आणि तिच्याकडे भीक मागू लागला. अचानक या मुलाच्या डोळ्यात काहीतरी जातं आणि तो इतके तिकडे पाहू लागतो. हे पाहून बाईकवर बसलेली डॉ.अजयिता या गरीब मुलाला जवळ घेतात आणि त्याच्या डोळ्यात फुंकर घालून डोळ्यातला कचरा काढतात. हे पाहून त्या गरीब निरागस मुलाच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य दिसून येतं. या निरागस मुलाच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून ती महिलाही त्याला पैसे देते. तिने दिलेले पैसे पाहून हा निरागस मुलगाही खूश होतो आणि निघून जातो.

आणखी वाचा : डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

गरीब-श्रीमंतातली दरी दूर करणाऱ्या या गोड क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ डॉ. अजयिता यांनी ट्विटरवर शेअर करताना तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलंय. हा व्हिडीओ पाहून काही युजर्स भारावून जात आहेत. एका गरीब मुलालाच्या डोळ्यात फुंकर घालून या महिलेने थेट गरीब-श्रीमंतीच्या भेदभावावरच फुंकर घातली असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या महिलेने या व्हिडीओच्या माध्यमातून थेट हृदयालाच स्पर्श केला आहे.

आणखी वाचा : एक-दोन नव्हे तर तब्बल ४० भुकेल्या मगरींनी सिंहिणीला घेरलं, मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने केली सुटका!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक वाघांनी केला नाही हल्ला; VIRAL VIDEO पाहून कारण सांगू शकाल का?

हा व्हिडीओ पाहून लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलं की, महिलेचा दयाळूपणा आवडला, पण गाल ओढणे खूप हिंसक होते.” दुसऱ्या युजरने लिहिलं की, ‘जोरजोरात गाल ओढण्याच्या व्यतिरिक्त बाकी इतर दृश्य हे खूपच सुंदर आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman pulls homeless boys cheek at traffic signal viral video divides internet prp
Show comments