woman pushes child on railway track video: एका प्रवासी महिलेनं तीन वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर फेकल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका प्रवासी महिलेनं क्रूरतेचा कळस गाठल्यानं नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक लहान मुलगी रेल्वे प्लॅटफॉर्म उभी असताना पाठीमागे बेंचवर बसलेली महिला त्या मुलीला जोराचा धक्का देते आणि रेल्वे रुळावर फेकते. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्यानं अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल. ही घटना अमेरिकेच्या पोर्टलॅंड शहरातील असून पोलिसांनी लहान मुलीला धक्का देणाऱ्या महिलेला अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर असेलेल्या महिलेनं चिमुकल्या मुलीला अचानक धक्का दिला आणि….
चिमुकली तिच्या आईसोबत पोर्टलॅंडच्या गेटवे ट्रांजिट सेंटर प्लॅटफॉर्मवर असल्याचं या व्हिडीओ दिसत आहे. त्याचदरम्यान, पाठीमागच्या बेंचवर बसलेली महिला समोर उभ्या असलेल्या लहान मुलीला अचानक धक्का देते. त्यानंतर ती मुलगी रेल्वे रुळावर खाली पडते. सुदैवाने त्यावेळी ट्रेन आली नसल्याने त्या मुलीचा अपघात टळला. चिमुकलीला या महिलेनं धक्का का दिला, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीय. पण या गंभीर घटनेची तातडीनं पोलिसांनी दखल घेऊन आरोपी महिलेला बेड्या ठोकल्याचं कळते आहे.
इथे पाहा व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक निर्दयी महिला एका चिमुकलीला रेल्वे रुळावर अचानक फेकताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा आला असेल. कारण गोंडस मुलीला अचानक एका महिलेनं धक्का दिल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात, ते सत्य आहे. कारण वेळ आली होती पण काळ आला नव्हता, व्हिडीओ पाहिल्यानंतर असंच म्हणता येईल. कारण लहान मुलीला धक्का दिल्यानंतर समोरून कोणतीही ट्रेन येत नव्हती. त्यामुळे सुदैवाने या मुलीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही, अशी माहिती आहे.