माणसाने थोडी दया दाखवली तर हे जग किती सुंदर होईल. अशाच एका दयाळू महिलेच्या कृतीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. एका महिलेने नुकतेच एक मांजरीच्या पिल्लाला जीवदान दिले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे. भटकंती करत असताना तिला अचानक मदतीसाठी हताशपण ओरडणारे पिल्लाचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर तिला दोन लहान मांजरीचे पिल्लू सापडले. प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले चिमुकल्या मांजरीच्या पिल्लांना कोणीतरी क्रूरपणे कचऱ्यामध्ये टाकून दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण ही महिला जेव्हा असहाय्य मांजरीच्या पिल्लांना पाहते तेव्हा अजिबात संकोच न करत त्वरीत त्यांच्या मदतीसाठी धावते. भयानक परिस्थितीमधून त्यांना बाहेर काढते. प्लॅस्टिकच्या पिशवीतून ती मांजरीचे पिल्लू हळूवारपणे काढते आणि त्यांना तिच्या हातात घेते तो क्षण एका व्हिडिओमध्ये कॅप्चर केला आहे.

तिने शेअर केलेल्या व्हिडिओबरोबर कॅप्शनमध्ये महिलेने तिचे दु:ख आणि निराशा व्यक्त केली. “मी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे लहान मांजरीचे पिल्लू स्वत:ला सांभाळू शकत नाही. त्यांना जिवंत टाकणे म्हणजे तुम्ही त्यांना मारत आहात,” असे तिने लिहिले. या निष्पाप जीवांना त्यांच्या आईपासून वेगळे करण्याच्या भावनिक वेदना आणि क्रूरतेवर तिने प्रकाश टाकला. “लोक किती सहजपणे मुलांना त्यांच्या आईपासून वेगळे करतात. तुम्ही सर्वजण या वेदनांशी निगडीत आहात की, पण मला आईची वेदना एक स्त्री म्हणून समजते आहे , तिला कदाचित तिचे मांजरीचे पिल्लू सापडत नसेल ज्याला तिने दोन महिने तिच्या पोटात ठेवले होते आणि त्यांची काळजी घेतली आहे.

हेही वाचा – ऑफिसमध्ये लावलेला नियम बॉसलाच पडला महागात, एकदा नव्हे तर पाच वेळा भरावा लागला दंड

येथे व्हिडिओ पहा:

हेही वाचा – प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल


व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया आणि दृश्ये मिळाली आहेत. “त्या मांजरीच्या पिल्लांची म्याँव अशी हाक ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. माणुसकीला काळीमा!” अशी प्रतिक्रिया एकाने दिली. दुसरा म्हणाला,”२ मांजरीच्या पिल्लांची जीव वाचवल्याबद्दल धन्यवाद, देव तुझं भले करो!”

अशा लहान प्राण्यांचा त्याग करण्याची इच्छा असलेल्या लोकांबद्दल घृणास्पद कमेंट शेअर करताना लोकांनी मागे हटले नाही.

ही घटना दयाळूपणाचे महत्त्व आणि साध्या या कृतींद्वारे दर्शवले आहे.