Shocking video: कोलकातामधील महिला डॉक्टर मर्डर केस आणि आता बदलापूरमधील रेप प्रकरण यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो, तरुणी असो वा विवाहित महिला, यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनाचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले, पण अजूनही नराधम वठणीवर येतं नाही आहेत. कोलकातामधील महिला डॉक्टर मर्डर केस आणि आता बदलापूरमधील रेप प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भररस्त्यात पाच तरुणांनी एका तरुणीबरोबर काय केलं हे तुम्हीच पाहा. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा नराधमांचं करायचं तरी काय ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिल्लीत रात्रीच्यावेळी भररस्त्यात पाच तरुण मुलं स्कूटी चालवणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करताना दिसत आहेत. त्यांनी दोन्ही बाजूनं तिला घेरलेय आणि मधून मधून तिच्या स्कुटीला लाथा मारत आहेत. दरम्यान, ही तरुणी आपल्या स्कुटीचा वेग वाढवते, पण ते गुंड प्रवृत्तीचे तरुणसुद्धा आपली बाईक तितक्याच वेगानं पळवून तिला गाठत आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हे तरुण अनेक किलोमीटरपर्यंत तिचा पाठलाग करत होते. शेवटी महिलेला एक वाहतूक पोलिस दिसले, ज्याने दोन मोटारसायकली थांबवून तिच्या सुरक्षिततेची खात्री केली.

ही घटना पाठीमागून गाडी चालवत असलेल्या एक व्यक्तीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होत पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनीदेखील या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेत दोन तरुणांना ताब्यात घेतलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीच सांगा साहेब बापाला सांगू कसं? MPSC आंदोलनात विद्यार्थीनीचं सरकारकडे साकडं; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

अशा नराधमांचं करायचं तरी काय ?

रोज मुलींसोबतच्या अत्याचाराच्या अनेक घटना आपण आजही एकत असतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतप्त झाले असून, अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत. अनेक लोकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. कोणी या तरुणांना जन्माची अद्दल घडवा असं लिहिलंय, तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हटलंय. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा, अशा नराधमांचं करायचं तरी काय ?