सध्या महागाई प्रचंड वाढत चालली आहे. तसेच दररोज स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर आणि त्याच्या वाढत्या किमतींबद्दल आपण सतत बातम्या पाहत असतो. त्यामुळे अनेक गृहिणी गॅसची बचत कशी करू शकतो, याचे एकेक उपाय शोधून काढत असते. असाच सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट जुगाड, एका महिलेने करून दाखवला आहे. त्याच व्हिडीओबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर rekha_sharma.001 नावाच्या अकाउंटवरून व्हायरल होणारा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक महिला स्वयंपाक करताना दिसत आहे. आता जे स्वयंपाक करतात त्यांना माहीत असेल की, पुऱ्या तळण्यासाठी गॅसचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. मात्र, व्हिडीओमधील महिलेने तसे होऊ नये यासाठीच हा उपाय केलेला आहे. तर गॅसवर एक कुकर ठेवला आहे, त्यामध्ये बटाटे उकडण्यासाठी ठेवल्याचे आपण पाहू शकतो. मात्र, या कुकरला झाकण लावलेले नाही.

हेही वाचा : ‘अगं ए चिमणे कुठं गं गेलीस…’; चिमणी अन् इतर पक्षांचे कसे कराल रक्षण, टिप्स पाहा

आता त्याच उघड्या कुकरवर, महिला एक कढई ठेवते आणि त्यामध्ये तेल ओतून घेते. नंतर कुकरच्या वाफेने तापलेल्या कढई आणि त्यातील तेलामध्ये ती भराभर पुऱ्या तळून घेते, असे व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा भन्नाट, मात्र तेवढाच धोकादायक जुगाड पाहून नेटकरी काय म्हणाले आहेत ते पाहू.

“चुकून त्या कुकरच्या प्रेशरने कढई हलली तर काय होईल?” असे एकाने लिहिले आहे. “पाणी १०० अंश सेल्सियस तापमानावर तापते. भाज्यांना शिजण्यासाठी साधारण ३०० अंश सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे हा जुगाड अशक्य आहे”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “ओ ताई, एवढी बचत नका करू” असे तिसऱ्याने म्हटले आहे. “याला बचत नाही, मूर्खपणा म्हणतात”, असे चौथ्याने लिहिले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @rekha_sharma.001 नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला आत्तापर्यंत १३.२ मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman saving gas while cooking food this unique hack went viral on social media netizens shocked dha
Show comments