पोहे हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. भारतात जवळपास सर्व ठिकाणी नाश्त्यामध्ये आवडीने पोहे खाल्ले जातात. एवढंच नाही तर पोह्यांचे विविध प्रकार आहे जे खायला लोकांना प्रचंड आवडते. फिल्म स्टारपासून सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वजण सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खातात. भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदौरचे पोहे भारतात प्रसिद्ध आहेत. आता विचार करा इतक्या लोकप्रिय पदार्थाला कोणी सोशल मीडियावर जाऊन सर्वात वाईट पदार्थ असे म्हटले तर काय होईल? अर्थाथच त्या व्यक्तीला लोक ट्रोल करतील. अगदी तसेच झाले.

सोशल मीडियावर एका महिलेने भारतात प्रसिद्ध असेलेल्या पोह्यांना नाव ठेवली मग काय नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायाला सुरवात केली. सध्या ही पोस्ट चर्चेत आहेत. लोकांनी महिलेच्या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा- Flirting मध्ये पुणेकरांचा नादखुळा! एफसी रोडवर तरुणाने तरुणीला दिली चिठ्ठी, लिहिले, “तू पेन्सिल आहेस का?….”

एक्स (ट्विटरवर एका महिलेने ayushii5k नावाच्या अकांऊटवरून पोह्यांचा फोटो पोस्ट शेअर केला. फोटोमध्ये पोह्यांची भरलेली फोटो दिसत आहे. फोटो शेअर करताना ‘सर्वात वाईट खाद्यपदार्थ’ असे कॅप्शन दिले.

हेही वाचा – बाईकला हँडलऐवजी लावलं ट्रॅक्टरचे स्टेअरिंग, तरुणाचा विचित्र जुगाड पाहून चक्रावले लोक, पाहा Viral Video

लोकांना त्यांच्या आवडीच्या पदार्थाचा असा अपमान करणे सहन झाले नाही त्यामुळे अनेकांनी महिलेच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली. एकाने पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “तु चांगले अन्न खाण्या लायकच नाहीस.” दुसऱ्याने लिहिले की, “मॅडमसाठी दूध आणि चिवडा मागवा, सॉरी कॉर्न फ्लेक्स”

Story img Loader