सोशल मीडियावर प्राण्यांचे हल्ला करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका सीगल पक्ष्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका महिलेने तिच्या बर्गरचा आस्वाद घेत असताना काही सीगल पक्ष्यांनी तिच्यावर हल्ला केला. अचानक केलेल्या हल्यामुळे महिला घाबरते आणि जोर जोरात किंचाळते. व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना घडली तेव्हा महिला लाईव्ह व्हिडीओ शुट करत होती आणि बर्गरबाबत माहिती देत होती. व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची तयारी केली परंतु गोष्टी तिने ठरवल्या तशा घडल्या नाही. व्हिडिओमध्ये बर्गर हातात घेऊन ती तिच्या लाईव्हमध्ये पाहणआऱ्या प्रेक्षकांना माहिती देत होती तेवढ्यात जे घडले ते खूप भयानक होते कारण एका सीगलने अचानक तिच्या बर्गरवर हल्ला केला आणि महिला जोरजोरात ओरडू लागली. बर्गर तिच्या हातातून जमिनीवर पडले. इतर सिगल पक्षी देखील तेथे आले. बर्गरसाठी त्यांच्यामध्ये चढा-ओढ सुरु झाली. सर्व काही लाईव्ह व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाले. त्या बाईने तितक्यात सुटकेचा उसासा टाकला आणि सीगल्स सँडविचचा आस्वाद घेण्यासाठी तिची बाजू सोडून जाताना थोडेसे हसले.

येथे व्हिडिओ पहा:

एक्सवर व्हिडिओला ५ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्यामुळे, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आनंददायक व्हिडीओवर मीम्स शेअर करून प्रतिक्रिया व्यक्त केली.

येथे काही सर्वोत्तम मीम्स पहा:
“हे सीगल्स निर्दयी आहेत,” सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी एक म्हणाला.