Local Train Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खरंच खूप भावनिक असतात; तर काही इतके मजेशीर असतात की, ते पाहून हसू आवरणे कित्येकदा अवघड होते. सध्या सोशल मीडियावर एका लोकल ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला प्रवासी ट्रेनमध्ये असे काही करतेय की, जे पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, “अरे, ही लोकल ट्रेन आहे की ब्युटी पार्लर”. लोकल ट्रेनमधील असे दृश्य तुम्ही आजवर कधीही पाहिले नसेल.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Psycho Bihari (@bihari.broo)

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नित्या श्री सिवन हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षा तिने सार्थ ठरवली आहे
बॅडमिंटन व्हाया क्रिकेट! नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कास्यपदक
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
R. G. Chandramogan hatsun agro products arun icecream owner net worth house and success story from selling icecreams to becoming a billionaire
एकेकाळी हातगाडीवर विकायचे आईस्क्रीम अन् आता आहेत अब्जावधींचे मालक; वाचा एकविशीत कंपनी सुरू करणाऱ्या आर. जी. चंद्रमोगन यांची यशोगाथा
Loksatta Chatura Henrietta Lakes made a significant contribution to the Research of cancer
कॅन्सरच्या संशाेधनात मोलाचं योगदान देणारी हेनरिएटा लेक्स
Shreyas Iyer Helps Poor Woman with Money Video Viral
Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!
Barcelona sensation Lamine Yamal's father stabbed; suspects in custody
Lamine Yamal : धक्कादायक! स्पेनचा फुटबॉलपटू लॅमिन यमालच्या वडिलांवर चाकू हल्ला, हॉस्पिटलमध्ये दाखल
pune video viral
पुण्यातील रिक्षावाल्याने केला अनोखा जुगाड, पावसाळ्यात रस्ता नीट दिसावा म्हणून…; VIDEO एकदा पाहाच

लोकल ट्रेनमध्ये आता हेच बघायचे बाकी होते

हल्ली तरुण मुलीच नाही, तर लहान मुलींपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला मेकअप करायला आवडतो. त्यामुळे मेकअपचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतोय. हल्ली लग्न, वाढदिवसासह अनेक लहान-मोठ्या कार्यक्रमांना महिला छान मेकअप करून तयार होतात. काही वेळा त्या मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्येही जातात. अगदी हेअरस्टाईलपासून मेकअपपर्यंत पार्लरमध्ये जाऊन स्वत:चा मेकओव्हर करून घेतात. पण, काही महिलांना ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास वेळ मिळत नाही. अशा वेळी महिला काही ना काही जुगाड करतात. एका लोकल ट्रेनमधील मेकअपशी संबंधित असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी असे म्हटले की, लोकल ट्रेनमध्ये आता हेच बघायचे बाकी होते.

More Stories On Viral Video : व्यक्तीने पाच लाखांचा हिऱ्याचा हार चुकून कचऱ्यात फेकला! नंतर घडले असे की, Video पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

ट्रेनमधील गर्दीत महिला करतायत आयब्रो

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक लोकल ट्रेन प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने भरलेली दिसत आहे. ट्रेनच्या डब्यात एवढी गर्दी आहे की, पाय ठेवायला सोडा; पण कोणाला हालचाल करायलाही जागा नाही. अशा या लोकलमध्ये गेटजवळ एक महिला गर्दीत उभी राहून चक्क दुसऱ्या महिलेचे आयब्रो करून देत आहे. हे दृश्य पाहून एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ बनवून, तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

“माझी अपॉइंटमेंट फिक्स करा”, युजर्सच्या मजेशीर कमेंट्स

bihari.broo नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, काय पाहायचे बाकी आहे अजून. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, माझी अपॉइंटमेंट फिक्स करा. तिसऱ्या युजरने लिहिले की, ही गोष्ट भारतातील गरिबी आणि बेरोजगारीचे वर्णन करते.