सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण क्वचितच एखादा व्हिडिओ असा असतो की जो कौतुकास्पद असतो. सध्या अशाच एका व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहेत. एवढंच नाही तर त देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी हा पुन्हा शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बसस्थानकावर फळे विकल्यानंतर फळे विकणाऱ्या महिलेच्या कौतुकास्पद कामगिरीचा हा व्हिडिओ आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हायरल व्हिडिओवर आनंद महिंद्रा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हायरल व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

आदर्श हेगडेने शेअर केला फळ विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ

हा व्हिडिओ आदर्श हेगडे (@adarshahgd) नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बसस्थानकाभोवतीचा कचरा उचलून कचरापेटीमध्ये टाकताना दिसत आहे.

आदर्शने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”ही महिला कर्नाटकातील अंकोला बसस्थानकाजवळ फळे विकते.काही ग्राहक फळ खाल्यानंतर कचरा खिडकीतून बसस्थानकावर टाकतात. पण ही महिला फळे विकल्यानंतर हा कचरा उचलून कचरापेटीत टाकते.” महिलेची ही साधी कृती केवळ आदर्शलाच नव्हे तर आनंद महिंद्रा यांनाही आवडली आहे.

हेही वाचा – आईस्क्रीमच्या काडीपेक्षा लहान कुत्रा पाहिलंय का? गिनिज बुकने दिला हा मोठा मान

व्हिडिओ पाहून आंनद महिंद्रा झाले प्रभावित

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक चांगला संदेश देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे -”हे आपल्या देशाचा खरे हिरो आहे. स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करत आहे. यासोबतच आनंद महिंद्रा यांनी आदर्शला या महिलेचा पत्ताही विचारला आहे. त्यांची माहिती मिळाल्यास मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकेन, असे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

काहींनी ते अशाच घटनांचे कसे साक्षीदार आहेत हे सांगितले तरी आणि काहींनी या महिलेचे कौतुकही केले.

हेही वाचा : भिकारी झाले उद्योजक! ‘या’ व्यक्तीने सुरू केलं बेगर्स कॉर्पोरेशन, म्हणे, ‘दान नको, गुंतवणूक करा!’

“भाग्यवान आणि श्रीमंत लोकांच्या तुलनेत दुर्बल आणि गरीबांमध्ये समाजाप्रती जबाबदारीची भावना जास्त असते हे वास्तव आहे!” पंकज शंकर यांनी लिहिले आहे.

“मला माझ्या देशाचा आनंद आणि अभिमान आहे की, तुमच्या प्रकारचे लोक अजूनही जगत आहेत आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे कौतुक करतात. त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करा; ती जे करत आहे त्याबद्दल तिला अभिमान वाटू द्या आणि असे करून त्यांचे कौतुक करा.,” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले.

तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटले? आम्हाला नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman selling fruits cleans up after customers at karnataka bus stop impressed anand mahindra wants to contact the real hero snk
Show comments