आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असताना त्यासाठी काहीतरी खास करायचे म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. घराला थोडी सजावट म्हणा किंवा मित्रमंडळी, नातेवाइकांना बोलावून घरी छोटेखानी पार्टीचे नियोजन केले जाते. मात्र, वाढदिवसाची पार्टी किंवा कार्यक्रम कसाही असला तरीही त्यामध्ये विशेष आकर्षण असते ते म्हणजे केकचे.
सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने घरबसल्या कोणत्याही फूड डिलिव्हरी अॅपवरून हवे ते पदार्थ मागविता येतात. त्याचप्रमाणे वाढदिवसासाठी एका मुलीने, तिच्या भावासाठी झोमॅटोवरून एक केक ऑर्डर केला होता. मात्र, तो घरी आल्यानंतर तिने केकवर जे पाहिले, त्यानंतर तिला हसावे की रडावे, असे झाले होते. त्या मुलीने ऑनलाइन केक मागविताना काही विशेष सूचना त्या अॅपवर लिहिल्या होत्या. मात्र, तिच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळेच तिच्याकडे आले. त्या मुलीने सोशल मीडियावर त्याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट करून, घडलेला गमतीशीर किस्सा शेअर केला आहे. नेमके काय घडले ते पाहू.
हेही वाचा : नाशिकची ‘Super woman’! गरम तेलात हात घालून तळत आहे ‘उलटा वडापाव’; व्हायरल व्हिडीओ पाहा
झोमॅटो किंवा कोणत्याही फूड अॅपवरून ऑर्डर करताना त्यामध्ये ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला काही विशेष सूचना लिहून द्यायच्या असल्यास तशी सोय असते. त्यानुसार मिहिका असरानी नावाच्या मुलीने, तिच्या केकवर ‘हॅपी बर्थडे हिमांशु’, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा हिमांशु’, असे लिहून पाठविण्याची विशेष सूचना दिली होती. त्यानुसार केक पाठविणाऱ्या दुकानदाराने त्यावर सांगितलेला मजकूर लिहिला होता. मात्र, कोणताही पदार्थ मागविताना त्यासोबत कटलरी [चमचे, टिश्यू पेपर इत्यादी] नको असल्यास, कटलरी पाठवू नका [do not send cutlery], असा पर्यायदेखील तेथे उपलब्ध असतो. मिहिकाला त्या केकबरोबर कटलरी हवी होती. त्यामुळे तिने कटलरी पाठवा [सेंड कटलरी] असे म्हटले होते. मात्र दुकानदाराने चमचे पाठवण्याऐवजी, केकवरच ‘सेंड कटलरी’ असे लिहिले होते.
त्यामुळे ऑर्डर केलेल्या केकवरील मजकूर वाचून त्या मुलीने अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला आणि, ‘केकवर केवळ हॅप्पी बर्थडे’, असे लिहायचे होते; ‘सेंड कटलरी’ नाही. -ती सूचना झोमॅटोसाठी होती” असे व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचे दिसत आहे. या मजेशीर किश्शावर नेटकऱ्यांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते पाहू.
हेही वाचा : Viral video : थंडी सोसत नाही म्हणून चालत्या गाडीत केली ‘शेकोटी’! व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा..
“सॉरी! पण हा किस्सा खूपच खूपच मजेशीर आहे.”, असे एकाने म्हटले आहे. “यात चूक झोमॅटोची नाही; दुकानदाराची आहे. आम्हालाही माहीत आहे,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “मी एकदा चहा मागविला होता आणि त्याबरोबर कटलरी पाठवा म्हणून सूचना दिली होती; पण मग त्यांनी चहा पिण्याचे कप पाठविण्याऐवजी चक्क काटे-चमचे पाठवले,” असा अजून गमतीशीर किस्सा सांगितला. चौथ्याने, “चला, किमान एक चॉकलेट तरी मोफत मिळाले आहे,” असे हसण्याची इमोजी टाकत गंमत केली आहे. तर शेवटी पाचव्याने, “तुमच्या सगळ्यांसाठी आता हा वाढदिवस खूपच अविस्मरणीय बनला आहे,” असे लिहिले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @mihikaasrani नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हायरल होणाया व्हिडीओवर आतापर्यंत ६७४K इतके व्ह्युज मिळाले आहेत.