पालक हे मुलांचे सर्वोत्तम चीअरलीडर्स असतात. आजकालच्या नव्या कल्चरबद्दल जरी त्यांना कळत नसलं तरी ज्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो त्यात ते आनंद मानतात. नेदरलँड्समधील मास्ट्रिच विद्यापीठात फूड लॉ आणि पॉलिसीमध्ये पीएचडी करत असलेल्या मधुरा रावने तिच्या आईला तिचा पीएचडीचा प्रबंध पूर्ण झाल्याचा मेसेज करुन कळवले, मात्र आईला त्यातील काही कळालं नाही. तरीही यावर तिच्या आईने तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे. या दोघींच्या चॅटता स्क्रिनशॉट सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मधुराने ट्विटरवर तिच्या आणि आईच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये तिने तिच्या आईला पीएचडीचा तिचा प्रोजेक्ट पाठवला आहे, आणि त्यावर अखेर पूर्ण झाला असा मॅसेज केला आहे. यावर तिच्या आईने दिलेला रिप्लाय पाहू कदाचीत तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येईल. तिच्या आईने यावर रिप्लाय दिलाय की, मला यातलं तसं काही कळत नाही पण हे बघून खूप छान वाटत आहे. आकाशातील सर्व ताऱ्यांपेक्षा हे चांगले दिसत आहे. तुझा मला खूप खूप अभिमान आहे.
पाहा फोटो
हेही वाचा – अस्वलाने पर्यटकांसोबत घेतला मेजवानीचा आनंद, माणसासारखा टेबलवर बसून जेवतानाचा Video व्हायरल
हा फोटो मधुराने ट्विटरवर शेअर करत, “माझी आई सर्वोत्कृष्ट महिला आहे” असं कॅप्शन लिहलं आहे. हि पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.