९० च्या दशकातली सदाबहार गाणी कुणाला आवडत नाहीत? तो काळ असा होता जेव्हा फॅशन वेगळी होती. स्टाईल वेगळी होती. त्यावेळी करण्यात येणारी फॅशन आणि गाणी यासह अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आजही समोर आल्या तर माणसं भावूक होतात. मग ती गाणी असो किंवा एखादी वस्तू. अनेक चांगल्या, वाईट किंवा मस्त आठवणी या काळाशी जोडल्या गेल्या आहेत. सोशल मीडियावर ९० च्या दशकातल्या एका डायरीची पानं व्हायरल होत आहेत. या डायरीच्या पानांवर जुन्या गाण्यांच्या ओळी लिहिल्या आहेत.
ट्विटरवर ८ जूनला या महिलेने डायरीची काही पानं शेअर केली आहेत. ही पोस्ट शेअर करताना महिलेने म्हटलं आहे की मी ९० च्या दशकातली आहे, त्या काळात डायरीत गाणी लिहिली जात असत. याशिवाय आपल्या आवडीची गाणी मनात साठवण्यासाठी लोकं विविध युक्ती करत होते. या पोस्टला आत्ता २.२ मिलियन लोकांनी पाहिलं आहे. २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट पाहून लोक आपल्या आठवणी जागवत आहेत. लोकांना तो काळ आठवतो आहे ज्यावेळी लोक आपली गाणी लिहून काढायचे, शायरी लिहायचे, कविता लिहायचे. त्यामुळे ही पोस्ट लाईक करण्यासह लोकांनी आपल्या आठवणीही सांगितल्या आहेत. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे.
काही जणांनी आपल्या आठवणीही जागवल्या आहेत. एक युजर म्हणाला की तो काळ असा होता की लोक पॉज देऊन देऊन गाणी ऐकायचे. तसंच गाण्याचे बोल लिहून ठेवायचे. रिवाईंड, फॉरवर्ड करुन गाणी ऐकत असत. तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की मी असं करत होतो तेव्हा माझ्या आईने मला पकडलं होतं आणि डायरी फेकून दिली होती.