Kedarnath Temple Viral Video: नुकताच केदारनाथ मंदिर गाभाऱ्यात सोन्याची पॉलिश करण्यावरून वाद झाला होता. आता आणखी एका व्हिडीओने वाद उफाळून आला आहे. यावेळी निमित्त ठरलं ते केदारनाथ गाभाऱ्यात महिलेने उडवलेले पैसे..हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.केदारनाथ मंदिरात एक संतापजनक घटना घडली असून यामुळे अनेक शिवभक्त दुखावले गेले आहेत. मंदिरात भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सफेद रंगाची साडी नेसलेली महिला मंदिरातील भटजींच्या उपस्थितीत शिवलिंगावर नोटांची उधळण करताना दिसत आहे. यानंतर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.  दरम्यान, ही महिला किन्नर असल्याचं समोर आलं आहे. तिचं नाव निशा असून तिने शिवलिंगावर तब्बल १० लाख रुपये उडवल्याचं बोललं जात आहे.

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – चिमुकलीच नाही तर अख्ख गाव ढसाढसा रडलं; लाडक्या शिक्षकाच्या बदलीचा ह्रदयस्पर्शी VIDEO…

उत्तराखंडतील प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपासून हा वाद चांगलाच तापलाय. याबाबत आता कुठे वातावरण शांत होतंय तर, आणखी एका प्रकरणावरून मंदिरात खळबळ उडाली आहे. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman showers currency notes on shivling inside kedarnath temple draws flak for disgraceful act kedarnath temple video viral on social media srk