सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून तुम्ही लगेच पुढे स्क्रोल करता; पण काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. काही व्हिडीओतील दृश्यं अनेकदा खूप विचारात पडतात की, हे कसं शक्य आहे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक तरुणी स्विमिंग पूलमध्ये असे खतरनाक टॅलेंट दाखवते की, जे पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी स्विमिंग पूलमधील खोल पाण्यात उतरून असा काही स्टंट करते, की जो पाहूनच आपल्याला धक्का बसतो. हा स्टंट इतका अवघड आहे की, जो पाहिल्यानंतर कोणीही तो लगेच करण्याचे धाडस करू शकत नाही. सर्वोत्तम जलतरणपटूसुद्धा या तरुणीसारखं अशा प्रकारे धाडस करण्याची कल्पना करू शकत नाही. पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहताना लोकांना दम लागतो आणि ही तरुणी हातात डंबेल्स घेऊन नियमित चालल्याप्रमाणे पाण्यात चालतेय.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तलावाच्या आत हातात डंबेल्स घेऊन जात असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर ही तरुणी डंबेल्स घेऊन पाण्यात पळण्याचा प्रयत्न करीत आहे. यादरम्यान तिच्या तोंडातून पाणी येत नाही आणि ऑक्सिजन पाइपच्या मदतीने ती श्वासही घेत नाही. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे पाण्याखाली असल्याचे दिसत आहे. तिचा हा अद्भुत पराक्रम पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ @Enezator नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे. या व्हिडीओवर लोकांनी विविध प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलेय की, मला व्हिडीओ बघूनच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.