दिल्ली मेट्रो नेहमी विचित्र घटनांसाठी चर्चेत असते. यावेळी महिलांच्या डब्यात झालेल्या जोरदार वादामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ही नाट्यमय वाद समोर आला आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्रतिक्रिया उमटत आहेत

व्हिडिओमध्ये दोन प्रवासी महिलांमध्ये जागेवरून वाद सुरु आहे. हा वाद इतका वाढतो की दोघी एकमेकींच्या केस ओढताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये एक महिला दुसर्‍या प्रवासी महिलेवर भांडताना ओरडताना ऐकू येते, “मा‍झ्या मांडीवर बस”. ऐकून दुसरी महिला खरंच महिलेच्या ति मांडीवर जाऊन बसते ज्यामुळे ती महिला आणखी भडकते.

मांडीवर बसायला आलेल्या महिलेला ती जोरात ढकलून देते आणि मला न विचारता मांडीवर कशी बसली असे म्हणत भांडू लागते. बघता बघता वाद वाढत जातो आणि दोघी एकमेकीचं केस ओढू लागतात आणि मारमारी करू लागतात. दोन्ही महिला शारीरिक मारामारी करताना, इतर प्रवासी स्तब्ध शांतपणे पाहत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा – “हीच खरी देशभक्ती!” हैद्राबादमधील या कॅफेमध्ये रोज सकाळी गायले जाते राष्ट्रगीत! पाहा सुंदर Video

व्हिडिओ पहा:

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली की, “मला वाटते महिलेचा राग योग्य होता. अनेक महिला अनोळखी लोकांना दाबून जागा मिळवण्याचा प्रयत्न करतात, कधीकधी समोरच्याला विचारतही नाही. प्रत्येकाला हे सोयीचे नसते.”

दुसऱ्याने पुढे म्हटले, “प्रत्येकजण इतका निराश असतो की, त्यांना थोडासा चढ-उतार सहन होत नाही आणि ते लगेचच आक्षेपार्ह बनतात.”

तिसऱ्याने लिहिले, “मला वाटते की कधीकधी हा एक हक्क आहे. प्रत्येकजण कामावरून परत येत असताना आणि प्रत्येकजण थकलेला असतो. ज्यांना जागा मिळते ते एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत बसून राहतात. म्हणून मला वाटते, कधीकधी जागा सोडणे ठीक आहे आणि कोणीतरी उभे असताना तुम्हाला बसून एक तास प्रवास करण्याची आवश्यकता नाही. असे म्हटले तरी, इतर लोकांना बसण्याची तितकीच गरज नाही, कृपया इतरांच्या वैयक्तिक स्पेसचा आदर करा. शेवटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांवर हात उचलू नका.”

दिल्ली मेट्रो अनेकदा विचित्र आणि भांडणामुळे चर्चेत असते. कधी कोणी मेट्रोमध्ये अचानक डान्स करण्यास सुरुवात करते तर कोणी मारामारी करताना दिसते. याआधी, दिल्ली मेट्रो स्थानकावरील आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यात दाखवण्यात आले होते की एक व्यक्ती दोन लोकांमधील भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण तिलात कानाखाली मारण्यात आली.

Story img Loader