Viral Video: इंडिगो कंपनीच्या विमानात प्रवासादरम्यानच्या अनेक मजेशीर, तर वादग्रस्त घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये दिव्यांग महिलेला विमानातून उतरण्यासाठी व्हीलचेअर न देणे, प्रवासी बसणारी सीट तुटलेली असणे, प्रवाशांबरोबर वाद होणे, हेडरेस्ट कव्हर मास्क म्हणून चेहऱ्याला लावणे आदी अनेक घटना घडलेल्या तुम्ही आजवर ऐकल्या असतील. तर आज सोशल मीडियावर काही तरी खास पाहायला मिळालं आहे. एका चित्रकार महिलेनं एअर होस्टेसचे अगदीच खास डूडल तयार केलं आहे.
इलस्ट्रेटर सुमौली दत्ताने (इलस्ट्रेटर म्हणजे पुस्तकांसाठी चित्रे काढणारे चित्रकार) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती इंडिगो कंपनीच्या विमानातून प्रवास करीत असते व एअर होस्टेसशी संवाद साधताना दिसते आहे. चित्रकार सुमौली दत्ता नेहमी अनोळखी व्यक्तींचे सुंदर चित्र रेखाटते. पण, त्यांच्याबरोबर ते कधीही शेअर करत नाही, कारण ती खूप लाजाळू आहे असे तिचे म्हणणे आहे. पण, यावेळी तिने हिम्मत करून एअर होस्टेसचे एक खास डूडल तयार केले आणि तिला भेट देण्याचे धाडसही करून दाखवले. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…केळी पिकवण्याची नैसर्गिक पद्धत तुम्हाला माहिती आहे का? आजीबाईंनी दाखवली VIDEO मध्ये ट्रिक
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चित्रकार महिलेनं जेव्हा एअर होस्टेसच्या चेहऱ्याचे खास डूडल तयार करून दिले, तेव्हा एअर होस्टेसने तिचे भरभरून कौतुक केलं, चित्रकार महिलेच्या छोट्याश्या प्रयत्नाला दाद दिली. तसेच तिला धन्यवाद म्हणण्यासाठी एक खास पत्र, कॅडबरी आणि काही ड्रायफ्रूट्सची पाकिटेसुद्धा एअर होस्टेसने चित्रकार महिलेला दिली. हा सर्व प्रसंग व्हिडीओमध्ये महिला चित्रकाराने शूट केला आहे व नंतर एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @woodledoodledesigns चित्रकार महिलेच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान या चित्रकार महिलेनं तिची कलाकारी दाखवली आणि फ्लाइट अटेंडंटचे खास डूडल तयार केलं. महिला काही सेकंदात फ्लाइट अटेंडंटच्या चित्राला जिवंत रूप देऊन चित्तथरारक डूडल तयार करते. नेटकरी हा व्हिडीओ पाहून महिला कलाकाराच्या या कलेचं कौतुक, तर तिच्या कौशल्याला दाद देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण, त्यात एका चित्रकाराने फ्लाइट अटेंडंटच्या स्वाक्षरीपासून सुंदर चित्र रेखाटले होते. तर आज फ्लाइट अटेंडंटचे खास डूडल तयार करण्यात आलं आहे, जे अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.