Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो सध्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. खरं तर मेट्रोची निर्मिती लोकांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी करण्यात आली आहे, पण गेल्या काही काळात या मेट्रोमध्ये प्रवासासोबत भलतंच काहीतरी घडताना दिसतंय. हे सर्व कमी होतं म्हणून की काय, आता थेट मेट्रोचा वापर भांडण, रोमान्स करण्यासाठी केला जातो. इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक तरुणी एका तरुणासोबत भांडण करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे भांडता भांडता तरुणी इतकी आक्रमक झाली की तिनं रागाच्या भरात त्याला अक्षरश: थोबाडीत मारली. अर्थातच चारचौघांत मार खाल्ल्यामुळे तरुणदेखील तितकाच संतापला अन् मग त्यानं पुढे काय केलं हे आता तुम्हीच पाहा.
…अन् तिनं मारली थोबाडीत
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी सीटवर बसलेल्या एका तरुणासोबत जोरजोरानं भांडत आहे. बहुदा सीटवरूनच त्यांचं भांडण झालं असावं अशी शक्यता आहे. कारण आसपासचे लोक तरुणीला शांत करताना दिसत आहेत. पण, हळूहळू दोघांचाही पारा आणखी वाढला आणि रागाच्या भरात तरुणीनं त्याला थोबाडीत मारली. मार खाताच मग तरुणसुद्धा भडकला आणि तिला मारण्यासाठी पुढे सरसावला. पण, तेवढ्यात एक महिला प्रवासी मध्ये पडली अन् तिनं तरुणाला रोखलं. दरम्यान, इतर प्रवासीसुद्धा मध्ये पडले आणि दोघांना एकमेकांपासून दूर नेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी त्या मुलावर ओरडताना दिसत आहे. एका जागेवरून भांडण झाल्याचे दिसते. यानंतर ही मुलगी या तरुणावर हात उचलते, त्यानंतर मुलगा हतबल होतो आणि मुलीकडे धावतो, तेव्हा मुलीची आई मुलाचा हात पकडते. यानंतर मुलगा म्हणतो की मुलगी असल्याचा गैरफायदा घेऊ नका. यानंतर आजूबाजूचे सर्व प्रवासी हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
दिल्ली मेट्रोचा हा व्हायरल व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एका एक्स अकाउंटने शेअर केला आहे, जो आतापर्यंत सात लाख ५३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. या घटनेबद्दल संताप व्यक्त होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले… जर तुम्ही तिला मारलं असतं तर तो मुलगा आतापर्यंत तुरुंगात गेला असता.