सापाला अनेक लोकं घाबरतात. त्याच्या समोर जाण्याचीही काहींना हिंमत नसते. सापाला पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सापाला घराच्या पायऱ्यांवर आलेला पाहून एका महिलेने त्याला हकलवण्यासाठी पायातील चप्पल घेऊन मारली. मात्र, साप ती चप्पलच घेऊन पळाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक साप घराच्या पायऱ्यांवर येण्याचा प्रयत्न करत आहे. तितक्यात घरातील महिला त्याला घाबरवण्यासाठी चप्पल घेते आणि त्याच्यावर मारते. त्यानंतर साप तर लांब जातो मात्र जाताना ते चप्पल देखील तोंडात घेऊन जातो. साप चप्पल घेऊन जाताना पाहून महिला त्याला ऐ…ऐ करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
( हे ही वाचा: Video: आईस्क्रीम देत नाही म्हणून चिमुरडी लागली रडायला; रागाच्या भरात असे काही केलं की…)
येथे पाहा व्हिडिओ
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. त्यात त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, साप या चप्पलेचे नक्की करणार काय? त्याला तर पायही नाही आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत. एकाने म्हटलंय, हा नक्कीच बिहारचा साप असावा, इथला नेता किंवा साप रिकाम्या हाती कधीच जात नाहीत.