काही जणांना आपल्या पाळीव प्राण्यांबद्दल किती प्रेम असते. आता हेच बघाना गोल्ड फिशने फिश टँकमधला दगड गिळला म्हणून अस्वस्थ झालेल्या महिलेने त्याच्या ऑपरेशनसाठी चक्क एक दोन हजार रुपये नाही तर तब्बल तेहत्तीस हजार पाचशे रुपये खर्च केले.
ऑस्ट्रेलियामध्ये राहणा-या महिलेच्या घरातील फिश टँकमध्ये गोल्ड फिश होता. आपल्या आवडत्या गोल्ड फिशचे नाव तिने काँकर असे ठेवले होते. फक्त एक वर्षाचा आणि जवळपास ५ सेंटीमीटर लांब असलेल्या या माशाने टँकमधला दगड गिळला आणि तो त्याच्या तोंडात अडकला यामुळे तडफडत असलेल्या माशाला मरणासाठी तसेच सोडून देण्यापेक्षा या महिलेने थेट प्राण्यांच्या दवाखान्यात धाव घेतली.
तडफडणा-या माशाला घेऊन तिने ब्रिसबेनचे पशूवैद्यकिय रुग्णालय गाठले. येथल्या डॉक्टरने या माश्याच्या घशात अडकलेला दगड काढला आणि त्याला जीवनदान दिले. या महिलेचे नाव इमा मार्श असे समजते आहे. या माशाला वाचण्यासाठी तिने जवळपास तेहत्त्तीस हजार रुपये खर्च केले. तिला याबद्दल विचारले असता, आपण माशावरही इतर पाळीव प्राण्याइतकेच प्रेम करतो त्यामुळे त्याला मरताना मला पाहायचे नव्हते म्हणून मी त्यावर इतका खर्च केला असल्याचे तिने सांगितले. खर तर गोल्ड फिश साधरण २० रुपयांपासून बाजारात मिळतात पण या महिलेने हजार पट खर्च या माशाला वाचवण्यासाठी केला आहे. त्यामुळे पहिल्यांदाचा माश्याच्या ऑपरेशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. खर तर या रुग्णालयाचा ऑपरेशनचा खर्च सात हजारांच्या आसपास आहे पण या महिलेने माशाला रुग्णालयातच बरा होईपर्यंत ठेवून दिले त्यामुळे तिला २६ हजार रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा