‘अॅनाबेल : क्रिएशन’ या चित्रपटाची जगभर चर्चा आहे. जगभरात वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित झालेल्या या भयपटानं प्रेक्षकांना चांगलंच हादरवून सोडलंय. या भयपटाचा काही मिनिटांचा ट्रेलर पाहून लोक अक्षरश: घाबरले होते. तेव्हा प्रत्यक्ष सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांची काय अवस्था झाली असेल, हे वेगळं सांगायला नको. तरीही अनेक उत्साही लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला तर काहीजण घाबरून अर्ध्यावरून हा चित्रपट सोडून पळाले, अशाही बातम्या ऐकायला मिळाल्या. पण या चित्रपटासंदर्भात एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक चांगलेच चक्रावले आहेत. ‘डेली मेल’नं दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्टला ब्राझीलमधल्या एका तरूणीनं आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत अॅनाबेल चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर ती विचित्र वागू लागली. तिनं स्वत:ला इजा पोहोचून घेण्याचाही प्रयत्न केला. या तरूणीनं अॅनाबेल पाहूनच असं केलं असल्याचं ‘डेली मेल’नं म्हटलं आहे.

या व्हिडिओची सत्यता ‘लोकसत्ता’नं पडताळून पाहिली नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डेविड सँडबर्ग दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या आठड्यात जगभरात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या कथानकापेक्षा त्यातील दृश्यांमुळे तो सर्वाधिक चर्चेत आला.

Story img Loader