Woman stealing viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजकाल प्रसिद्धीसाठी आणि काही व्ह्यूज, लाइक्ससाठी लोकं कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियाची ही क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चाललीय. मेट्रोत डान्स, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून स्वत:च्या फायद्यासाठी लोक दुसऱ्यांना त्रास द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत.

देशभरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असतानाही या रील्स स्टार्सना आता कंटेटसाठी एक नवा पर्याय सापडला आहे. सध्या सोशल मीडियावर एक रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय, ज्यात एक महिला एका दुकानात चोरी करताना दिसतेय. फक्त एका व्हिडीओसाठी या महिलेची मजल चोरी करण्यापर्यंत पोहोचली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा… VIDEO: “देव कोणत्या रूपात…”, जिममध्ये अचानक एकावर पडला डंबेल अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एका दुकानात एक महिला शॉपिंगसाठी आली आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी ती आली असल्याचं भासवून चक्क चोरी करताना दिसत आहे. जत्रेतील एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात दुकानदाराचं लक्ष नसताना तिने हे कृत्य केलं आहे. गर्दीचा फायदा घेत या महिलेने एक-दोन नाही तर तीन ते चार नेलपॉलिश लंपास केल्या. महिलेने कोणी पाहत नाही ना याची खात्री करून हळूच नेलपॉलिश आपल्या बॅगेत भरल्या.

हेही वाचा… अरेरे! कल्याण रेल्वेस्थानकावर स्पायडरमॅन मागतोय भीक, VIRAL VIDEO पाहून कपाळावर माराल हात

हा व्हिडीओ @miss_nisha7301 या इनस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मेले मे भाभीने की चोरी” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल २१.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत, तर एक लाखापेक्षा जास्त जणांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.

हेही वाचा… हद्दच झाली! रीलसाठी तरुणाने सायकलस्वार वृद्धाच्या चेहऱ्यावर मारला स्प्रे अन् पुढच्याच क्षणी…, VIDEO पाहून बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं नका करू, कारण गरीब लोकं असंच पोट भरतात.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जर तुम्ही त्यांची मदत करू शकत नाही, तर त्यांचे नुकसान करण्याचा तुम्हाला कोणताच हक्क नाही.”

दरम्यान, सोशल मीडियावर चोरीच्या अनेक घटनांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Story img Loader