Viral video: राजधानी मुंबईच्या लोकलमध्ये अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर, कधी कधी या रेल्वेखाली येऊन आत्महत्याही केल्या जातात. जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही असं वारंवार सांगण्यात येतं. तरीदेखील अनेक जण आपल्या जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्ध होण्यासाठी अनेक यूजर्स खतरनाक स्टंट करताना दिसतात. तर काही लोक रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही तरी असं करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे रुळ ओलांडू नका, जर रेड सिग्नल असल्यास रस्ता ओलांडू नका असं सतत सांगितलं जातं.
हल्ली लोक काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. या माध्यमांवरील काही व्हिडीओ आपल्याला भावनिक करुन जातात. सध्या ट्विटरवर अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेनं आत्महत्या करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की एका महिलेने अचानक येणाऱ्या फास्ट ट्रेनसमोर उडी घेतली. व्हिडीओमध्ये स्पष्टपण दिसत आहे की, एका महिलेने अचानक हाय-स्पीड ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चालकाने ताबडतोब ब्रेक मारले. ज्यामुळे महिलेचा जीव वाचला. मात्र, तिच्या हाताला दुखापत झालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे.या घटनेचा थरारक क्षण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करताच व्हिडीओ व्हायरल झाला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. तसेच या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. एकानं म्हंटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का” तर आणखी एकानं, “अशाप्रकारे जीव देऊ नका रुग्णालयामध्ये लोक आयुष्यासाठी भीक मागत आहेत त्यांना बघा” अशी प्रतिक्रिया दिलीय.