आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी चुकून एका औषधाऐवजी दुसरे वेगळेच औषध घेतले असेल यात शंका नाही. अशा आपण अनेक घटना ऐकत असतो, परंतु कधी कोणी औषधाऐवजी एअरपॉड्स गिळल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? तुमचं उत्तर नक्कीच नाही असं असेल. पण सध्या एका महिलेने औषधाऐवजी चक्क अ‍ॅपलचे एअरपॉड गिलळ्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील ५२ वर्षीय टिकटोकरने ऑनलाइन खुलासा केला आहे की, तिने तिच्या पतीचे अ‍ॅपलचे एअरपॉड प्रो हे व्हिटॅमिनची गोळी समजून गिळले आहेत. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. एकीकडे लोक ही बातमी समजताच आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे काही लोक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत. ही धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना तेव्हा घडली जेव्हा रियाल्टार तन्ना बार्कर नावाची महिला तिच्या मैत्रिणीबरोबर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती. इनसाइडरच्या वृत्तानुसार, ती मैत्रीणीशी बोलण्यात इतकी गुंग झाली की तिने चुकून तिच्या पतीचे एअरपॉड प्रो हे व्हिटॅमिन समजून गिळले.

हेही वाचा- “स्वतःचा फोटो पाहून लाज वाटली..” एका फोटोमुळे बदललं महिलेचं आयुष्य, तब्बल ५० किलोहून अधिक वजन कमी केलं

एअरपॉड गिळलेल्या महिलेने सांगितलं की, चालत असताना तिने व्हिटॅमिन घेण्याचे ठरवले, यावेळी तिने व्हिटॅमिन पाण्याबरोबर घेतले मात्र तिला ते घशात अडकल्याचं जाणवलं म्हणून तिने आणखी पाणी प्यायलं. यानंतर तिने मैत्रीणीने निरोप घेतला आणि AirPods घ्यायला गेली तेव्हा तिच्या हातात गोळ्या होत्या आणि एअरपॉड नसल्याचं समजलं.

यानंतर आपल्याबरोबर असं काही घडलं आहे यावर आपला विश्वास बसत नव्हता असंही महिला म्हणाली. शिवाय ती म्हणाली, “आता माझ्या आतमध्ये एअरपॉड आहे.” दरम्यान, घरी पोहोचल्यावर या महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला तेव्हा त्याने तिला ही गोष्ट कोणालाही सांगू नको असं सांगितले. पण, तिने ही घटना तिच्या TikTok फॉलोअर्सबरोबर शेअर करण्याचा निर्णय घेतला. या महिलेचा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि अनेक वापरकर्ते तिच्याबरोबर घडलेली घटना ऐकून आश्चर्यचकित झाले.

हेही पाहा- आयुष्यात एवढी रिस्क…! काकांनी चालत्या ट्रकच्या खाली झोपण्यासाठी बनवला आरामदायी बेड; जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले…

एक युजरने लिहिलं की, मी फक्त कल्पना करत आहे की तुमचा मित्र तुम्हाला तुमचे एअरपॉड्स खाताना पाहत आहे, शिवाय एअरपॉड गिळल्यानंतर महिलेने अनेक डॉक्टर आणि मित्रांशी संपर्क साधला, ज्यांनी तिला एअरपॉड्स नैसर्गिकरित्या तिच्या सिस्टममधून बाहेर पडू देण्याचा सल्ला दिला. बार्कर यांनी इनसाइडरला सांगितलं की, एका मित्राने मला विचारलं की तू दोन्ही एअरपॉड्स गिळले आहेत का? यावर मी नाही म्हटले आणि तो म्हणाला ‘ठीक आहे, हे चांगलं झालं कारण त्यात चुंबक असते दोन्ही गिळले असते तर समस्या निर्माण होऊ शकली असती..’ सोमवारी, त्याने एक फॉलो-अप व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तिने फॉलोवर्सना कळवले की एअरपॉड्स तिच्या शरीरातून सुरक्षितपणे बाहेर पडले.