woman dip into minus 27 degree cold water video : हिवाळ्याच्या दिवसात थोडी जरी गुलाबी थंडीची चाहुल लागली, तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. भर थंडीत घराच्या बाहेर जाताना हातपाय थरथरल्याशिवायर राहत नाहीत. पण रशियाच्या एका तरुणीनं नादच केलाय. उणे २७ अंश सेल्सियस पाण्यातच डुबकी मारून या तरुणीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. डुबकी मारल्यानंतर जेव्हा तिला हुडहुडी भरते तेव्हा एक कप कॉफीचा आस्वाद घेतानाही ही तरुणी व्हिडीओत दिसत आहे. या तरुणीचा रशियाच्या बर्फाळ प्रदेशातील हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
तरुणीनं डुबकी मारून झाल्यावर मोबाईवरून दाखवलं पाण्यातील तापमान
@TheBest_Viral नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “थंडीसाठी कॉफी”, असं कॅप्शनही या व्हिडीओला दिलं आहे. एक तरुणी ब्लॅक स्विमिंग कॉश्चूममध्ये बर्फाळ प्रदेशातील एका तलावात उणे २७ अंश सेल्सियस पाण्यात डुबकी मारते. त्यानंतर तिला हुडहुडी भरल्यावर ती मस्त ऐटीत एक कप कॉफीचा आस्वाद घेताना या व्हिडीओत दिसत आहे. कॉफीचा एक घोट पिऊन झाल्यावर ती मोबाईलमधून उणे २७ अंश सेल्सियस तापमान असल्याचं लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवते. हा व्हिडीओच्या रशियाची राजधानी मॉस्को शहराजवळ शूट केल्याची व्हिडीओच्या फुटेजनुसार समजते आहे.
इथे पाहा व्हिडीओ
तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण आतापर्यंत या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ९ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, फिनलॅंड आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. रशिया परिसरात राहणारे काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. या तरुणीनेही अशाच प्रकारे स्टंटबाजी केली आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं, “अशाप्रकारचे कृत्य करणं मजेशीर नाहीय”. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेटवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीली थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.