लहान मुलं ही मातीचा गोळा असतात. जसा आकार देणार तशी ती घडतात, असं म्हटतं जातं. लहानपणीच आपण मुलांवर संस्कार केले तर पुढं जाऊन ते देशाचे एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनतील. अन्यथा मग ते लोकांशी वाईट वागत राहतील. त्यामुळे लहान मुलांना घडवताना चांगल्या गोष्टी त्यांना शिकवाव्यात, म्हणजे ते चुकीचं काम करणार नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका कागदाच्या मदतीने आईने आपल्या लेकी सर्वात मोठी शिकवण दिलीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ एक आई आणि मुलगी दिसतेय. या व्हिडीओमधल्या आईचं नाव ताहेर असं आहे. ती पाकिस्तानची असून सध्या अमेरिकेत राहतेय. आपल्या लेकीला शिकवण देत असताना एका कागदाची मदत घेतली आहे. एक कागद तिला दाखवून त्या कागदाला हवं ते चिडवण्यासाठी ती तिच्या लेकीला सांगते. आईच्या सांगण्यावरून ती मुलगी कागदाला हवं ते चिडवते. जसं जसं ती मुलगी कागदाला पाहून चिडवते तसं तसं आई तो कागद चुरगळते. असं करता करता तो कागद पूर्णपणे चुरगळून टाकला जातो. त्यानंतर मग तिने तो कागद पुन्हा मूळ स्वरूपात आणला आणि तिच्या मुलीला चिडवल्याबद्दल माफी मागायला सांगितली. मात्र, माफी मागितल्यानंतरही पेपर चुरगळलेलाच होता. तो पुन्हा पहिल्यासारखा कोरा दिसून येत नव्हता. ती आई लेकीला समजवते की तिने सॉरी बोलल्यानंतर कागद चुरगळेलेलाच होता. तसंच एखाद्याला चिडवल्यानंतर सॉरी जरी बोललो तरी समोरच्या व्यक्तीचं मन दुखलं जातं. त्यामुळे कुणाला चिडवणं ही वाईट गोष्ट आहे, असं आई तिच्या लेकीला समजून सांगते. हे कळल्यानंतर लेक तिच्या आईला आश्वासन देते की यापुढे ती असं कधी करणार नाही.

आणखी वाचा : एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रूबाब! बदकाच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या; ऐटीत ओलांडला रस्ता, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ प्रत्येकालाच आयुष्यातला सर्वात मोठा शिकवून जातो. हा व्हिडीओ गेल्या वर्षी शेअर करण्यात आला होता. परंतू तो आता नव्याने व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ आईने स्वतः the_aesthetic_side_of_hom नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक आईने लेकीवर केलेल्या संस्काराचे कौतुक केले आहे.

Story img Loader