जीवनाच्या प्रवासात प्रत्येकाला चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव येत असतो. आयुष्यात नक्की काय करायचं, काय घडलंय आणि काय करायची इच्छा आहे, अशा अनेक प्रश्नांचं कोडं सोडवण्यासाठी आपण मित्रमंडळी असो वा कुटुंबातील व्यक्ती त्यांच्याशी सल्लामसलत करत असतो. पण काही गुपित असे असतात, जे आपण कोणालाही सांगत नाहीत. मात्र, कधीतरी अशी परिस्थिती निर्माण होते की, आपल्याला हे गुपित सांगावेच लागतात. असंच काहिसं घडलं आहे एका महिलेबाबत…या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावनिक व्हाल, यात काही शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – सावधान! मोठ्या आवाजात गाणी ऐकताय, तब्बल १५० कोटी तरुणांना येऊ शकतं बहिरेपण; जाणून घ्या सविस्तर

एक महिला तिच्या दोन भाच्यांसोबत जीवनातील मोठं गुपित उघडं करते. याबाबत त्या चिमुकल्यांना जराही कल्पना नसते. ‘मी तृतीयपंथी आहे’, असं ती महिला त्या लहान मुलांना सांगते. त्यानंतर या मुलांचे हावभाव खूपच भावनिक होताना दिसतात. त्यांच्या डोळ्यांत अश्रू येऊ लागतात. जेव्हा महिला त्या मुलांना तिच्याबद्दल सांगत असते, त्यावेळी ही मुलं तिचं म्हणणं शांतपणे ऐकत असतात. पण जेव्हा या महिलेचं गुपित त्यांना कळतं त्यावेळी मात्र ही मुलं खूपच भावनाविवश होतात. एक मुलगी तर रडत रडत त्या महिलेला मिठीच मारते. तर दुसरी मुलगीही रडू लागते. त्यानंतर ही महिला त्या दोघींना प्रमाने जवळ घेते. अशा अनेक घटना बघितल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावतात.

इथे पाहा व्हिडीओ

या चिमुलक्यांच्या भावनिक व्हिडीओला britneypneang या नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. झालेला सर्व प्रकार या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख ९२ हजारांहून अधिक वेळा लोकांनी पाहिलं आहे. तर २५ हजारहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman tells secret of transgender children shocking reaction instagram video goes viral nss