एखाद्याच्या खिशातून चुकून रस्त्यावर पडलेले पाकीट किंवा पैसे दिसल्यावर कोणीही पटकन उचलून घेतो. तुमच्याबरोबर असे कधी घडले आहे का? तुम्हालाही कधी ना कधी रस्त्यावर पडलेले पैसे किंवा पैशांचे पाकिट सापडले असेल तेव्हा तुम्हालाही क्षणभर आनंद झाला असेच ना. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जिच्यासोबत असेच काहीसे घडले आहे. पण पैशांचे पाकीट उचलल्यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावर पडलेले पैशांचे पाकीट उचलयला जाते पण नंतर समजते की, ते पाकीट नसून एक जाहिरातीचे पँप्लेट आहे. हा काही प्रँक नसून ही एक नवीन मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अचानक सापडलेले पैसे कोणत्याही व्यक्तीला आंनद देतो., त्यामुळे लोकांच्या या भावनेचा वापर करून एका कंपनीने ही भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरली आहे.

हेही वाचा – केरळची कासवू साडी नेसून स्केटिंग करत चिमुकलीने दाखवला ‘ओणम स्वॅग’! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल तिचे फॅन

क्रस्ट पिझ्झा या पिझ्झा कंपनीने एक प्रमोशनल पॅम्प्लेट तयार केले आहे जे रस्त्यावर पडलेल्या पैशांच्या पाकिटासारखे डिझाइन केले आहे. ही अतरंगी डिझाइन पाहणाऱ्याला काही वेळ चक्रावून सोडते. लोकांना थक्कर करणे आणि त्यांची उत्सुकता वाढवण्याचा त्यांचा हेतू होता. या स्मार्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा – कोटामधील आत्महत्येच्या घटनांवर आनंद महिंद्रानी व्यक्त केले दुःख; विद्यार्थांना संदेश देत म्हणाले….

फ्लायरच्या डिझाइनला इंस्टाग्रामवर विविध प्रतिक्रिया मिळाल्या. लोकांनी सर्जनशीलतेचे(क्रिएटिव्हिटीचे) कौतुक केले आहे. काहींनी सांगितले की, इतरांचे लक्ष वेधून घेण्याची आकर्षक पद्धत आहे. पण सर्वांचे एकमत असे होते की, ही स्ट्रॅटेजी खरोखर प्रभावी होती.

Story img Loader