सध्या न्यूयॉर्कच्या सबवेमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला ट्रेनच्या दरवाज्यात अडकली आहे. तिचं डोकं दरवाजाच्या फटीत अडकलं आहे. ती कितीतरी वेळ अशा स्थितीत अडकून आहे पण मदतीसाठी एकही जण पुढे आलं नाही. दुर्दैव म्हणजे तिच्या समोरून या वेळात कितीतरी प्रवाशांनी ये जा केली, पण समोर काहीच घडलं नाही अशा थाटात सगळेच निघून जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहे. लोक इतके निर्दयी कसे असू शकतात असा प्रश्न विचारला जात आहे. आश्चर्य म्हणजे एक रेल्वे पोलीस कर्मचारी देखील तिच्याकडे कानाडोळा करत निघून गेलेली यात दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती की ही महिला मात्र मदतीसाठी अजिबात आरडाओरडा करत नव्हती. अत्यंत शांतपणे ती अवघडलेल्या स्थितीत उभी होती. तेव्हा हा व्हिडिओ एका प्रॅकचा भाग असू शकतो असंही बोललं जात आहे. माणसांचे स्वभाव आणि त्या त्या परिस्थितीत त्यांची वागण्याची, प्रतिसाद देण्याची क्षमता पाहण्यासाठी कदाचित हा प्रयोग असू शकतो असेही बोलले जात आहे. त्यामुळे ही महिला खरंच दरवाजाच्या फटीत अडकली होती की ती अभिनय करत होती या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहेत. पण कारण काही असलं तरी एखादी व्यक्ती अडचणीत असल्यावर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहण्याची न्यूयॉर्कच्या लोकांची ही मानसिकता काही अनेकांना रुचली नाही. त्यामुळे एखादा माणूस एवढा निर्दयी कसा काय असू शकतो हा प्रश्न राहून राहून अनेकांना सतावत आहे.