नोकरी करण्यामुळे आपल्याला आर्थिक स्थिरता मिळते पण नोकरी करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेकदा बॉस किंवा सहकाऱ्यांसह मतभेद किंवा वाद होतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की लोक नोकरी सोडून देतात. पण हे प्रकरण थोडे वेगळे आहे. एका तरुणीने आपल्या बॉस आणि सहकऱ्यांचा बदला घेण्यासाठी असे काही केले की ज्याची कोणी कल्पनाबी केली नसेल. तरुणीने जे काही केल्यामुळे बॉससह सर्व सहकाऱ्यांना चांगली फजिती झाली आहे. सोशल मीडियावर तरुणीने हा अनुभव शेअर केला आहे. आपला बदला पूर्ण करण्यासाठी तरुणीने जे काही केले ते सांगितले आहे. तरुणीचे म्हणणे आहे की, ऑफिसमध्ये तिला चांगली वर्तणूक दिली जात नव्हती त्यामुळे तिने नोकरी सोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरीच्या काळात आपल्या मॅनेजरबरोबर झालेल्या किरकोळ वादानंतर तरुणीने असे काही ज्यामुळे सोशल मिडियावर नवीन वाद सुरू झाला आहे. त्याने बदला घेण्यासाठी नोकरी तर सोडली पण आपल्या टीम मॅनेजर आणि इतर सर्व सहकाऱ्यांचे इमेलचे पासवर्ड बदलला आहे. ही तरुणी एका रेस्टॉरंटमध्ये काम करते.

हेही वाचा – २०२३मध्ये ‘या’ हटके हेअरस्टाइलला महिलांनी दिली पसंती; रुबाबदार पुरुषांची पहिली पसंत ठरली ‘ही’ हेअरस्टाइल

Reddit ने मुलीच्या इंस्टाग्राम पेजवर ही पोस्ट शेअर केली आहे. तरुणीने पोस्टमध्ये तिला कशा प्रकारे वागणूक दिली गेली आणि शेवटी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला याबाबत सांगितले. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “हे माझे बालिश कृत्य आहे याची मला पर्वा नाही. मला कामावर किती वाईट वागणूक दिली गेली म्हणून मी त्याकडे लक्ष देऊन इच्छित नाही. संपूर्ण टीममध्ये मी एकटी मुलगी होते, हे सांगून मी कोणतेही गर्ल कार्ड खेळत नाहीये.”

तरुणीने पुढे लिहिले की, “मी नोकरी सोडल्यानंतर एका आठवड्यानंतर, मला समजले की, मी अजूनही माझ्या मॅनेजमेंटच्या खात्यात लॉग इन करू शकते. आणि त्यानी पासवर्ड बदलला नव्हता. हे खाते मुळात रेस्टॉरंटचा संपूर्ण डेटाबेस होता. त्यात मेनू, स्टाफ, ऑर्डरिंग, स्टॉक इत्यादींची माहिती होती. “मी तयार केलेल्या बनावट ई-मेल वापरून मेल आयडी देखील बदलला आणि नंतर प्रत्येकाचे पासवर्ड बदलले जेणेकरून ते प्रवेश करू शकणार नाहीत.”

हेही वाचा – “आयुष्य मनमुराद जगता आलं पाहिजे!” निरासग चिमुकल्यांनी घेतला भिजण्याचा आनंद; घरात केले पाणीच पाणी

तरुणीच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तरुणीच्या या कृतीवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी याला बालिश म्हटले आहे तर काहींनी मुलीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman treated asdoormat quits job and then changes everyones passwords snk
Show comments