तस्करी करण्यासाठी तस्कर वेगवेगळ्या कृप्त्या शोधून काढतो. अनेक मार्गाने मानवी तस्करी केली जाते. पोलिसांच्या सापळ्यात आपण अडकू नये याची खबरदारी तस्कर घेतात. पण कायद्यापासून कितीही पळायचा प्रयत्न केला तरी शेवटी त्यांच्या हातात बेड्या पडणारच! याचा आयुष्यभर पुरेल असा अनुभव एका महिला तस्कराला आला. ही तस्कर एका १९ वर्षीय मुलीला चक्क बॅगेत भरून मोरोक्कोवरून स्पेनमध्ये घेऊन चालली होती.
Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय
एक महिला मोरोक्कोहून १९ वर्षीय मुलीला बॅगेत भरून चक्क स्पेनमध्ये घेऊन चालली होती. या महिलेच्या बॅगेत मुलगी लपली आहे याची शंकाही कोणाला आली नाही. पण स्पेन सिमा पोलिसांना मात्र या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी तिला अडवले. तिची बॅग झडती घेण्यासाठी पोलिसांनी उघडली असता यात १९ वर्षांच्या मुलीला लपवले होते. १ जानेवारीला स्पेन -मोरोक्को सिमेवर काही निर्वासित हे सिमारेषा ओलांडून स्पेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. याच संधीचा फायदा घेऊन ही महिला आत शिरली होती. दि मिररच्या बातमीनुसार या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या छोट्या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले आहे.
वाचा : ऐकावे ते नवलच! २०१७ मध्ये निघालेले विमान २०१६ ला पोहोचले