ऑस्ट्रेलियातीळ कॅनबेरा विमानतळावर [Canberra Airport in Australia] एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वांनीच आपल्या डोक्याला हात लावला. एका महिलेला विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून तिचं विमान सुटू नये यासाठी कोणाचीही पर्वा न करता सर्व सुरक्षा रक्षकांना चुकवून विमान थांबवण्यासाठी ती धावत विमानाच्या धावपट्टीवर पोहोचली होती. एवढ्यावरच ती महिला थांबली नाही, तर अगदी विमानासमोर जाऊन तिने ते विमान उडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या महिलेला क्वांटासलिंक [QantasLink] हे ॲडलेड [Adelaide] येथे जाणाऱ्या विमानात चढायचं होतं. परंतु, तिला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ट्विटर, फेसबुकसह इतर सोशल मीडिया माध्यमांवर शेअर होत असून, अनेक लोकांपर्यंत पोहोचला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.

सोशल मीडिया युजर डेनिस बिलिक [@dennis bilic] याने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये, महिलेने सर्व सुरक्षा रक्षकांना चुकवून विमानाच्या धावपट्टीवर धाव घेतली असून, विमानाच्या अगदी समोर उभी आहे असं दृश्य बघायला मिळतं.
ही महिला अगदी बिनधास्तपणे विमानासमोर फेऱ्या मारत, पायलटला काहीतरी बोलताना दिसत आहे.
बीबीसीच्या माहितीनुसार, या सर्व घटनेनंतर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून, या महिलेस बेल देण्यास नकार दिला होता.

या विचित्र घटनेमुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर याचा परिणाम झाला असून, विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेवरदेखील प्रश्न उभे राहिले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman try to stop the airplane so she wont miss her flight video gone viral dha