पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना तुम्ही गाडी अनलॉक करूनच बाहेर पडत आहात? तर अशी चूक करण्याआधी दहा वेळा विचार करा, कारण ही चूक करणं तुम्हाला चांगलच महागात पडू शकते. तुमच्या सेकंदभराच्या निष्काळजीपणामुळे चोरांचा फायदा होऊ शकतो. विश्वास बसत नाहीय ना? मग हा व्हिडिओ पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका महिलेने पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. काही सेकंदासाठी गाडी अनलॉक करून वस्तू घेण्यासाठी ती गाडीतून खाली उतरली. ती गाडीतून बाहेर पडत नाही तोच चोराने तिच्या निष्काळजीपणाचा फायदा उठवत तिची नवी कोरी गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण ही महिला धाडसी होती म्हणून ठिक. त्यामुळे आपल्या चालत्या गाडीच्या बोनेटवर चढून तिने ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल जराही गेला असता तरी गाडीखाली येऊन ती मृत्युमुखी पडली असती पण तिने धाडसाने आपली गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्या जिद्दीपुढे नमतं घेत चोराने गाडी थांबवली आणि तिची गाडी सोडून शेजारी उभी असलेली दुसरी गाडी पळवून नेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

तेव्हा तुम्हीही असा निष्काळजीपण करत असाल तर तुमच्याही बाबातीत असेच होऊ शकते कारण चोर कसे चोरी करतील काही सांगता येत नाही तेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरताना छोटी मोठी काळजी घेणं फायद्याचं ठरेल नाही का?